9 वर्षाच्या यशराजला दिली आजीने किडनी ; अपोलो हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Feb 14, 2021

नाशिक : शहरातील अपोलो हॉस्पिटल्स मध्ये एका 9 वर्षाचा मुलगा यशराज हयाच्यावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यास यश आले आहे. लहान मुलाचे किडनी प्रत्यारोपण नाशिक मध्ये पहिल्यादांच झाले असून किडनी दाता त्याची 57 वर्षाच्या आजीने नातवासाठी किडनी दान करुन समाजापुढे अनोखा आदर्श ठेवला आहे. या बाबतची अधिक माहिती देतांना अपोलो हॉस्पिटल नाशिकचे किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ. मोहन पटेल म्हणाले की, अवघ्या 9 वर्षाच्या यशच्या मागील एक वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे त्याचे डायलिसिस सुरु होते पण त्याच्या रक्तवाहिन्या लहान असल्याने फिशुला करणे शक्य नव्हते त्यामुळे कॅथेटर मधून डायलेसिस सुरु होते इतक्या कमी वयाच्या रुग्णाचे डायलिसिस सतत चालू ठेवणे हे रुग्णाला त्रासदायक,अडचणीचे आणि धोक्याचे असल्याने किडनी प्रत्यारोपण करणे अत्यंत आवश्यक होते.अशा वेळी मेंदूमृत व्यक्तीची किडनी मिळण्याकरिता लागणारा कालावधी अधिक असल्याने त्याला नातेवाईकांपैकी कोणीतरी किडनी दान करावे असे सांगण्यात आले, त्यानंतर यश च्या आई आणि वडिलांनी किडनी दान करण्याची तयारी दर्शविली पण त्यांच्या तपासणी नंतर दोघेही किडनी दान करण्यासाठी तंदुरुस्त नव्हते असे लक्षात आले या वेळी क्षणाचाही विलंब न करता आपल्या नातवाला सर्वसामान्य जीवन जगता यावे यासाठी यशच्या आजीने किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि यश ला पुन्हा नवीन जन्म प्राप्त करुन दिला.
यावेळी अपोलो हॉस्पिटलचे सर्व टिमचे यशराजच्या वडीलांनी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केल्याबद़दल आभार मानले.सदरच्या पत्रकार परिषदेत अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रसाद मुगळीकर, किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल, युरोसर्जन डॉ.किशोर वाणी, डॉ.प्रवीण गोवर्धने, जनरल सर्जन डॉ.मिलिंद शाह, ह़दय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.अभयसिंग वालिया, किडनी विकास तज्ञ डॉ.प्रकाश उगले, भूल तज्ञ डॉ.चेतन भंडारे, अवयव प्रत्यारोपण समन्वयक सौ.चारुशीला जाधव, विपणन प्रमुख डॉ.मंगेश जाधव, कैवल्य सोहनी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News