दुर्बिणीद्वारे सांध्यांची वेदनारहित शस्त्रक्रिया – आर्थ्रोस्कोपी

Feb 21, 2021

आर्थ्रोस्कोपी ही आपल्या सांध्यांवर दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवीन आणि विश्वसनीय तंत्रज्ञान म्हणून विकसित झाली आहे, परिणामी सर्वसामान्यांमध्ये या बद्दल फारशी जागृती नाही. गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले आहेत. पूर्वी मोठे ऑपरेशन म्हटले कि चिरफाड, टाके, अधिक रक्तस्त्राव, अधिक काळ रुग्णालयात वास्तव्य आणि शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीला लागणार जास्त वेळ हेच समीकरण होते. पण आता तसे नाही, आता वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कुठलीही चिरफाड न करता शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे, परिणामी रुग्ण लवकर बरा होऊन त्याच्या दैनंदिन कमला सुरुवात करू शकतो.

आर्थ्रोस्कोपी म्हणजे आर्थ्रोस्कोप च्या मदतीने संध्यावर शस्त्रक्रिया करणे. या मध्ये आर्थ्रोस्कोप नावाच्या एका विशिष्ट दुर्बीण उपकरणाद्वारे सांध्यांवर उपचार केले जातात, ज्याची रुंदी फक्त 4 मिमी. एवढीच असते. या उपकरणद्वारे डॉक्टरांना सांध्यामधील रचना कम्पुटरवर स्पष्ट दिसते आणि सांध्यावर मोठी चीर न देता ऑपरेशन करणे शक्य होते.

गुडघा, खांदा, खुबा, कोपर, मनगट आणि घोटा या सर्व सांध्यांवर आर्थ्रोस्कोपीच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात. गुडघ्याची गादी फाटणे, झीज होणे, लिगामेंट फाटणे, गुडघ्याच्या संधिवात, तसेच खांद्याचा फ्रोझन शोल्डर, हात वर उचलता न येणे म्हणजेच रोटेटर कफ टियर, वारंवार खांदा निखळणे अशा तक्रारी जर रुग्णाला असतील तर आर्थ्रोस्कोपीद्वारे त्यावर उपचार केल्याने नक्कीच फायदा मिळतो. 

आता रुग्णांनी शस्त्रक्रियेला घाबरण्याची मुळीच गरज नाही कारण खेळात झालेल्या दुखापती असो, संधिवात असो किंवा अपघातामुळे सांध्याला झालेल्या इजा, विज्ञानाच्या प्रागितिमुळे आर्थ्रोस्कोपी या विश्वसनीय तंत्रज्ञानाद्वारे  सांध्यावर विना-टाक्यांची शस्त्रक्रिया करणे आता सहज शक्य झाले आहे, ज्यामुळे ऑपरेशनदरम्यान रक्तस्त्राव होत नाही, रुग्ण लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतो आणि लवकर आपल्या नित्यक्रमास सुरुवात करू शकतो. या उपचारासाठी लागणार खर्च ही इतर शस्त्रक्रियाच्या तुलनेत निम्म्यापेक्षा ही कमी असतो. शेवटी सर्व रुग्णांनी सांधेदुखीसाठी शस्त्रक्रियेची गरज भासल्यास आधी आर्थ्रोस्कोपीची विचारणा तज्ञांकडे जरूर करा.

डॉ. अजिंक्य देसले (अस्थिरोग व स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञ)

MS (Ortho), FASM

वोक्हार्ट हॉस्पिटल , नाशिक

अपॉइंटमेंटसाठी संपर्क : 0253-6624444

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News