एचसीजी मानवता मार्फत कर्करोग जनजागृतीसाठी रविवारी ‘वॉक’

Feb 26, 2021

नाशिक : कर्करोगाच्या जनजागृतीसाठी येत्या रविवारी ‍WeRise – Celebrates Life संकल्पनावर आधारित वॉक चे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमात 9 वेगवेगळया देशांच्या 30 शहरांमधील धावपटू व्हर्च्युल पध्दतीने रविवार 28 फेब्रुवारी 2021 सहभागी होणार असल्याची माहिती एचसीजी मानवाताचे डॉ.राज नगरकर आणि वुईराइज सेलिब्रेटस लाइफ या चळवळीच्या तंझीम इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्करोगाशी लढून त्यावर विजय प्राप्त केलेल्यांनी व त्यांची शुश्रुषा करणाऱ्यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेली एक चळवळ आहे. दोन वेळा कर्करोगावर विजय मिळवलेल्या तंझीम इनामदार यांची हि कल्पना आहे. कर्करोगाशी लढा देतांना शारीरिक, भावनिक व आर्थिक आव्हानांना कसे सामोरे जावे लागते हे आम्ही चांगलेच जाणतो. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि आशावादी राहिले तर कर्करोगाशी लढणे बरेच सोपे होऊ शकते. उपचारादरम्यान शारीरिक शुश्रूषेबरोबरच भावनिक आधार व काळजी देखील तितकीच महत्वाची असते. प्रत्येक रुग्णाचा मार्ग वेगळा असू शकतो पण लढाईच्या या प्रवासात चांगला आधार आवश्यक असतो.
तंझीम म्हणतात, “माझा परिवार, मित्र व डॉक्टर सतत माझ्या बाजूने उभे होते हे माझे सदभाग्य होय. मात्र, समाजातील प्रत्येकालाच असा आधार मिळत नसतो. माझ्या उपचारादरम्यान मी सतत WeRise विषयी विचार करीत होतो. त्याबाबत मी माझा परिवार व मित्रांशी बोललो आणि सगळे लगेचच मला सामील झाले. कर्करोग रुग्णाला आनंद आणि आशा देण्याची आमची इच्छा आहे. शिवाय, जर मी माझ्या परिवाराच्या मदतीने उभा राहू शकलो तर माझ्या मदतीने प्रत्येक कर्करोग रुग्ण उभा राहावा अशी माझी इच्छा आहे. आयुष्य सुंदर असते आणि कर्करोगाच्या पलीकडे जाऊन बघण्यासारख आयुष्यात खूप काही असते. म्हणून आम्हाला आनंद वाटायचा आहे आणि इतरांबरोबर आयुष्य साजरे करायचे आहे. कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे व रुग्णांना आशावादी बनविणे हे आमच्या चळवळीचे ध्येय आहे व त्यास पाठींबा दिल्याबद्दल डॉ. राज नगरकर व एचसीजी मानवता यांचे आम्ही ऋणी आहोत. फेसबुक/ ग्रुप/ werisecelebrateslife किंवा insta werise-celebrateslife इथे आम्हाला भेटण्याचे आवाहन त्यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News