नाशिक :- 2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून AICTE Gender Equality अंतर्गत भुजबळ नॉलेज सिटीच्या अभियांत्रिकी महाविद्यातील संगणक विभागाने या कोवीड महामारी च्या काळा मध्ये मुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले होते. नाशिक मधील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर श्रुती पालखेडकर यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे 27 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजन केले होते. कुमार वयातील मुलीनी मासिक पाळी दरम्यान कशी काळजी घेता येईल तसेच या काळात घरचे पोषक अन्नपदार्थ सेवन करण्याचे बहुमोल मार्गदर्शन डॉक्टर पालखेडकर मॅडम यांनी दिला.
या काळात शरीरात होणारे बदल , स्वछता, या बाबत सर्वच मुलीनी लक्ष दयावे तसेच मनाचे आणि शरीराचे संतुलन सांभाळत सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा . तसेच सामाजिक दृष्ट्या घरातील आणि ईतर महिला यांना योग्य समुपदेशन करावे आणि समाज कार्याला हातभार लावावा असे आवाहन देखील डॉक्टरांनी केले. सदर ऑनलाईन व्याखानाचा लाभ अभियांत्रिकी मधील दिवतीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील मुलींनी घेतला.
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाणी, संगणक विभागाचे प्रमुख डॉक्टर खरात यांनी असे कार्यक्रम घेण्यास प्रोत्साहित केले. तसेच मेट भुजबळ नौलेज सिटी च्या व्यवस्थापिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी ऑनलाईन व्याख्यानासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.हा ऑनलाईन इव्हेंट यशस्वीरीत्या होण्यासाठी प्राध्यापिका शुभांगी हळकुंडे आणि ईतर प्राध्यापक वृंद तसेच पब्लिसिटी साठी श्री रवींद्र माणके या सर्वांनीअथक परिश्रम घेतले.




