भारतातील पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची मेट्, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये १२४ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. जया पवार व सौ. चित्रा शिरसाठ यांनी सावित्रीबाई व ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्रोफेसर पवन उदावंत यांनी कार्यक्रमास सुरुवात करत सावित्रीबाई फुलें बद्दल मनोगत व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज स्त्री-पुरुष समान आहे. स्त्रीचा समाजात सन्मान केला जातो. आज अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया हया उच्चपदस्थ अधिकारी आहेत. भारतीय समाजातील स्त्रीजातीच्या या प्रगतीची मुहर्तमेढ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली.उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली. या प्रसंगी करोनाच्या निर्बंधानुसार विद्यार्थी नसल्याने कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर पवन उदावंत ह्यांनी केले.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




