नाशिक (वार्ताहर ) मिडिया अॅडव्हर्टायझिंग चे प्रमुख संजय न्याहारकर यांच्या मातोश्री विमल वाल्मिक न्याहारकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी; सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांनी मुख्याध्यापक म्हणून बरीच वर्षे सेवा केली होती. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आप्त स्वकीयांनी सांत्वन करण्यासाठी प्रत्यक्ष घरी न येता दूरध्वनीद्वारे संपर्क करावा अशी विनंती संजय न्याहारकर यांनी केली आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






