विक्रमगड विधानसभेचे आमदार श्री. सुनिल भुसारा आपला माणुस यांनी सामाजिक परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन व COVID या महामारीच्या काळात लोकांना अत्यावश्यक रुग्णसेवा सुधारण्यासाठी तब्बल १२ क्रुझर अँम्ब्युलन्स या वाहनांचे वितरण आमदार निधीतुन जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्या. सदर वाहनांचा लोकार्पण सोहळा पालघर येथे करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी बोईसरचे आमदार राजेश पाटिल, जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ, निवासी जिल्हाधिकारी महाजन, सीईओ सालीमठसाहेब आणी इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर क्रुझर अँम्ब्युलन्स ह्या वाहनांचा पुरवठा फोर्स मोटर्सचे नाशिक डिलर उज्ज्वल फोर्स चे संचालक श्री. मिनलशेठ चौधरी यांनी केला. श्री. सुनिल भुसारा यांच्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी आणी प्रशासनाने अभिनंदन केले.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






