आपले स्वामी बोलतात…. “ अगं..!! हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल तुला !! ”

Jun 11, 2021

|| स्वामी लीला ||
स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये असंख्य लीला करत होते.. अक्कलकोटचे पोलीस.. न्यायाधीश इतकेच नव्हे तर डॉक्टर सुद्धा स्वामीच होते.. कोणी जर काही समस्या घेऊन आले तर मुखात येईल तो त्यावर असलेला उपाय.. कोणी आजारी व्यक्ती आला तर मुखात येईल ते औषध..!! अशा ह्या स्वामींच्या लीलांचा आनंद अक्कलकोटवासीय घेत होते.. ह्यातच असेच एकदा एक पुण्यामध्ये जानकी नावाची महिला रहात होती.. तीला नेत्ररोगाने पछाडलेले होते.. तिने पुष्कळ औषधोपचार केले परंतु काहीही फरक पडत नव्हता.. आता तर तीला डोळ्यांनी जवळ जवळ दिसेनासेच झाले होते.. काय करावे सुचत नव्हते.. तेव्हा कोणीतरी तीला अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अवतारी विभूती प्रगट झालेली आहे त्यांना मनोभावे शरण गेले असता आपले कार्य निश्चित होईल असे सांगितले.. स्वामींची कीर्ती ऐकून.. तिच्या मनात आपला आजार बरा होईल हा विश्वास जागृत झाला आणि ती अक्कलकोट येथे येते.. अक्कलकोट मध्ये आल्यानंतर तीला स्वामींच्या दर्शनाची ओढच लागली होती.. आणि ज्या ठिकाणी स्वामी महाराजांची स्वारी होती त्या ठिकाणी जानकीबाई आल्या.. स्वामींचे दर्शन घेऊन हात जोडून उभ्या राहिल्या.. आणि त्यांनी आपली व्यथा स्वामींना सांगितली.. तेव्हा करुणाघन स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले “ अगं..!! हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल तुला !! ”. स्वामींनी असे बोलताच तीला खूप आनंद झाला.. स्वामी कृपा झाल्याचा आनंदच तिच्या चेहऱ्यावर होता.. त्या नंतर तिने काही दिवस अक्कलकोट मध्येच राहून स्वामी आज्ञेप्रमाणे जे जे सांगितले ते केले आणि स्वामी भक्त हो !! आश्चर्य घडले.. काही दिवसांतच तीला अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागले.. स्वामी हेच एकमेव सत्य आहे म्हणून स्वामी वाणी सुद्धा सत्यच असणार ह्याची त्यांना प्रचीती आली…!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

||स्वामी बोध ||
अक्कलकोट मध्ये असलेला स्वामींचा आगळा वेगळा अवतार खरोखर बुद्धीच्या पलीकडे आहे.. जेव्हा आपण स्वामींच्या ह्या अशा अतर्क्य लीलाचे श्रवण करतो तेव्हा आपणास अप्रत्यक्षपणे स्वामी आपली बुद्धी हि लवचिक ठेवण्याचा संकेत देतात.. कारण स्वामी हे परमसत्य आहे.. आणि हे परमसत्य अतार्किक आहे.. ते बुद्धीच्या पलीकडे आहे.. बघा ना !! आजच्या लीलेत डोळ्यांचा आजार बरा व्हावा म्हणून स्वामींनी काय औषध दिले… खरोखर मती कुंठीत होते..!! असो. ह्या सह आजच्या लीलेत स्वामींनी हत्तीचा उल्लेख केलेला आहे.. खरतर ‘ हत्ती ’ सामर्थ्य..बुद्धिमत्ता.. दीर्घायुषी.. ज्ञान आदीचे प्रतिक आहे.. आणि हत्तीचे प्रत्येक अवयव हे प्रतीकात्मकरित्या विशेष गुणांची माहिती देतात.. जसे त्याचे सतत झुलणारे सुपा एवढे कान हे सकारात्मक ऐका आणि नकारात्मक सोडून द्या ह्या गुणाची प्रेरणा देणारे आहे.. वा डोळे धेय्याकडे स्पष्ट चिकित्सक दृष्टीकोन ठेवा.. ह्या गुणाची प्रेरणा देणारे आहेत.. वगैरे.. वगैरे !! थोडक्यात ‘हत्ती’ हे मानवाला विविध गुणांचे प्रेरणा देत आहे.. कारण मानवाचे गुणच ह्या मानवाच्या शक्ती आहेत..!! थोडक्यात आज आपणास आजच्या पिढी साठी “हत्तीचे मूत डोळ्यात घाल !! म्हणजे तुला दिसेल..!! ” ह्या स्वामी वाणीतून बोध घेता स्वामी आपणास हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कि, जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येकडे विवेकाच्या दृष्टीने बघ.. त्या समस्येच्या मुळा पर्यंत जा..!! त्याचे व्यवस्थित विश्लेषण कर.. म्हणजे आपल्या डोळ्यांना त्यात लपलेले समाधान स्पष्ट दिसेल..!! जसे आपणास दर महिन्याला पैशाची समस्या असले तर मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च ह्याचा अभ्यास कर.. नको त्या ठिकाणी वायफळ खर्च होतो का ह्याचा सूक्ष्म अभ्यास करायचा आहे.. स्वामी भक्त हो !! आपल्याला जीवनात येणाऱ्या संकट वा दु:ख वर मात करण्यासाठी आपल्याला गुणांच्या शक्ती धारण करायची आहे.. आणि मनन चिंतन करून.. आपली समस्या समजावून घेऊन.. त्या समस्या अनुरूप कोणता गुण धारण करायचा हे समाजावून घ्यायचे आहे.. आणि नंतर तो गुण धारण करून.. समस्येचा समूळ नाश करायचा आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तू गुणांचा खजाना आहेस.. मानवाचे गुण हीच त्याची शक्ती आहे.. हि समज आम्हाला दिली तुला धन्यवाद..!! इतकेच नव्हे तर आम्हा बाळावर विविध घटना प्रसंगाच्या निमित्ताने सतत कृपा करतो आहेस.. आणि तुझ्या अनन्य भक्तीच्या गुणांचा.. तुझ्यावरील अतूट अभेद्य श्रद्धेच्या गुणांचा विकास करत आम्हाला आत्मनिर्भर बनवतो आहेस.. हे आई !! तुला कोटी कोटी धन्यवाद.. धन्यवाद .. धन्यवाद !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

 

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News