आपले स्वामी बोलतात …..“ अरे, हि खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे !! ”.. स्वामींनी समाधीच लीला पूर्वी.. खेळणी देवून हीच उच्चतम आध्यात्मिक समज दिली कि, हम गया नही जिंदा है..!!

Jun 24, 2021

|| स्वामी लीला ||
आपले स्वामी महाराज प्रेमाचा सागर आहे.. स्वामी आई आहे… तिचे तिच्या बाळांवर खूप प्रेम आहे.. अक्कलकोट मध्ये स्वामींकडे असंख्य भक्त येत.. प्रत्येकाची चेतनेची अवस्था वेगवेगळी होती.. आणि प्रत्येकजण त्याच्या त्याच्या चेतनेच्या अवस्थेनुसार स्वामींकडे मागणे करत.. मग कोणी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी येई.. तर कोणी प्रापंचिक समस्येने ग्रस्त होऊन , दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून येई.. आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येकाची चेतनेची अवस्था काहीही असू दे.. परंतु स्वामी आईसाठी सर्व सारखेच होते.. स्वामींचे सर्वांवर सारखेच प्रेम होते.. जसे एखाद्या मातेला दोन मुले आहेत.. एक छोटे पाच वर्षाचे आणि दुसरे बारा वर्षाचे.. दोघेही त्या मातेकडे त्यांच्या समज नुसार हट्ट करतात.. आणि ती माता त्या दोघांचा त्यांच्या समज नुसार हट्ट पूरवते.. जसे दोघांनी चोकलेट चा हट्ट करताच.. ती लहान बाळाचे रडणे थांबवण्यासाठी त्याला चोकलेट देते.. पण मात्र मोठ्या मुलाला चोकलेट न देता.. जरा रागवून त्याचे दुष्परिणाम सांगते.. कारण त्याची चेतना लहान मुला पेक्षा उच्च असते.. थोडक्यात ह्या मातेचे दोघांवरही सारखेच प्रेम असते.. पण अभिव्यक्तीची पद्धत भिन्न असते.. असो. आपल्या स्वामींचे सुद्धा असेच होते.. स्वामींचे सर्वांवर प्रेम होते.. स्वामी प्रत्येकाच्या मनाची अवस्था जाणत.. आणि त्याला त्याच्या तयारी नुसार सांभाळत.. ह्यातच बार्शी येथे राहणारे श्री पुराणिक बावडेकर ह्यांच्यावर स्वामींचे खूप प्रेम होते.. पुराणिक बुवांची सुद्धा स्वामींच्या चरणी अनन्य भक्ती होती.. स्वामींना पुराणिक बुवांच्या कोमल हळव्या मनाविषयी जाणीव होती आणि म्हणूनच जेव्हा स्वामींना समाधी घेण्याचे लीला करायची ठरविली होती.. त्याच्या काही दिवसांपूर्वी स्वामींनी श्री पुराणिक बुवांना त्यांच्या गावी बार्शी येथे पाठवून दिले.. कारण स्वामींना माहित होते.. कि पुराणिक बुवा हे खूप हळव्या मनाचे आहेत.. त्यांना हा धक्का सहन होणार नाही.. जेव्हा पुराणिकबुवांना गावी पाठवून दिले त्यानंतर स्वामींनी तेथील एका सेवेक-यास जवळ बोलवले आणि त्याच्या हातात एक खेळणी देत बोलले “ अरे , हि खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे !! ”. पुढे स्वामींच्या समाधीच्या लीले नंतर जेव्हा बावडेकर अक्कलकोट येथे आले त्यांना सहाजिकच किती दु:ख झाले असेल ह्याचे आपण वर्णन नाही करू शकत.. त्यानंतर संबधित सेवेक-याने स्वामींनी दिलेली खेळणी त्यांस दिली.. श्री बावडेकर बुवा ह्यांनी ती खेळणी स्वामींचा प्रसाद.. स्वामींची आठवण म्हणून बार्शी येथे आपल्या घरी देव्हाऱ्यात नित्य पूजेत ठेवली..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

||स्वामीबोध ||
आजची स्वामी लीला खरोखर खूपच प्रेममय आहे.. स्वामीतर प्रेमाचा सागर आहेत.. कृपेचा सागर आहेत… ह्याची जाणीव करून देणारी आहे.. स्वामी भक्त हो !! श्री बावडेकर बुवा स्वामींच्या शाळेत शिकत होते.. स्वामींनी समाधीच लीला पूर्वी.. खेळणी देवून हीच उच्चतम आध्यात्मिक समज दिली कि, हम गया नही जिंदा है..!! ह्या संसाररुपी खेळात हे सर्व मानव शरीर खेळणी आहेत.. आणि ह्या खेळण्याचा रिमोट कंट्रोल स्वामींच्या म्हणजेच निर्गुण निराकाराच्या हातात आहे.. आणि जेव्हा आपण स्वामींची अनन्य भक्ती करतो.. स्वामींवर बेशर्त प्रेम करतो तेव्हा स्वामी ह्या खेळण्यांच्या मार्फत म्हणजेच विविध शरीरांना निमित्त करून हजारो लाखो पटीने वाढवून आपल्यावर प्रेम करत असतात.. म्हणून स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेतून आज आपणास आजच्या पिढीसाठी प्रेरणा घेता हाच बोध घ्यायचा आहे कि, जसे पुराणिक बुवांवर स्वामींचे अनन्य प्रेम होते.. स्वामींना बुवांच्या भावनांची जाणीव होती.. अगदी तसेच स्वामींना आपली अनन्य भक्तीची भावना सुद्धा समजत आहे.. आपल्या मनातील स्वामींच्या प्रती असलेली भक्ती.. स्वामींना समजत आहे आणि जसे पुराणिक बुवांना प्रेमाचे प्रतिक म्हणून एक खेळणी दिली.. अगदी तसेच वरती सांगितल्या प्रमाणे हि स्वामी आई.. आपल्या जीवनात आपल्यावर बेशर्त प्रेम करणारी माणस पाठवून.. स्वामींचे आपल्याप्रती असलेले प्रेम अभिव्यक्त करत आहे.. मग ह्यात कोणी आपले आई वडील असतील.. मुलगा असेल.. मुलगी असेल.. वा पती-पत्नी असेल वा संकटात मदत करणारी एखादी व्यक्ती असेल..!! स्वामी भक्त हो !! हे कोणीही असू शकत.. आपल्याला आपल्या जीवनात ह्या सर्व खेळण्याना बघून.. त्याचा आनंदाने स्वीकार करून स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जायचे आहे.. कारण ज्या गोष्टीला आपण धन्यवाद देतो ती हजारो लाखो पटीने वाढवून आपल्या जीवनात पुन्हा येते.. स्वामी भक्त हो बघा !! ह्या नंतर आपले जीवन कसे असेल.. स्वामी प्रेमाने जीवनातील नकारात्मकता.. विलीन होईल.. फक्त माणसच नव्हे तर हे पशु पक्षी.. सभोवताली असलेल्या निर्जीव वस्तू.. घर.. गाडी आदी सुद्धा स्वामीनी आपल्या जीवनात पाठवलेले प्रेमाचे खेळणे आहे ह्याची दृढता येईल आणि मग निश्चितच “ हम गया नही.. जिंदा है !! ” ह्या स्वामी प्रेम अभिवचनाची नित्य अनुभूती येईल.. स्वामी भक्त हो !! स्वामींची हि कार्य करण्याची पद्धत आहे.. आपल्या घरात.. गावात.. राज्यात.. देशात नव्हे तर विश्वात स्वामींच्या प्रेमाचे साम्राज्य येवू शकते.. प्रत्येकाने जर अनन्य प्रेमाच्या भावनेने आपले कर्म स्वामी भक्ती म्हणून केले तर विश्वातील नकारात्मक शक्ती ह्या प्रेमात विलीन होऊन नष्ट होईल.. साफ होईल..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तुझ्या असीम प्रेमाची बरसात ह्या विश्वावर अशीच कर.. तुझ्या प्रेमाने ह्या विश्वातील नकारात्मक शक्ती विलीन कर.. त्यानंतर तुझेच म्हणजेच सत्याचे.. शांतीचे.. अनन्य भक्तीचे साम्राज्य ह्या विश्वात स्थापित कर.. हे स्वामी !! आमच्या जीवनात तु ज्या ज्या शरीरांना निमित्त करून मग ते नातेवाईक असो वा मित्र मंडळी वा संकटकाळी धावून येणारे कोणी अनोळखी.. हि सर्व तुझ्या अनन्य प्रेमाचीच अभिव्यक्ती आहे.. हे गुरुआई !! तुझ्या असीम निरंतर प्रेमासाठी धन्यवाद ! धन्यवाद !! कोटी कोटी धन्यवाद !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News