आपले स्वामी बोलतात …. “अरे, कितने हजार ऑंख फोडे तुमने..?” …त्या नंतर तो आपल्या गावी गेला.. अतिशय कौतुकाने स्वामी च्या लीलांचे तो गुणगान गावू लागला..

Jul 7, 2021

|| स्वामी लीला ||
अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह अवतरले होते.. स्वामी महाराज असंख्य लीला करत होते.. स्वामींच्या लीला इतक्या अतर्क्य होत्या कि, कोणीही असु दे.. मग एक भक्त म्हणून बोला वा चिकित्सक.. त्याला स्वामी दर्शनाची ओढच लागे.. असेच एकदा एक इस्रायल धर्माचा डॉक्टर स्वामींची कीर्ती ऐकून दर्शनासाठी आला.. त्यावेळेला स्वामी महाराज स्वरुपानंदात रमलेले होते.. स्वामींचे आजानुबाहू रूप बघून… दिव्य तेजोमय कांती बघून त्याचे क्षणभर डोळेच दिपले म्हणा… त्याने स्वामींचे दर्शन घेतले.. आणि बाजूलाच हात जोडून उभाच राहिला तोच.. अचानक स्वामींनी त्याच्या कडे बघितले आणि बोलले “ अरे, कितने हजार ऑंख फोडे तुमने..?”. स्वामींचे हे अंत:साक्षित्वाचे बोलणे ऐकताच तो आश्चर्य चकित झाला आणि बोलला “ स्वामींना हे कसे समजले कि, मी डोळ्यांचा डॉक्टर आहे..!! ” आणि त्याने स्वामींचे चरण पकडले आणि प्रार्थना करत बोलू लागला कि, “ स्वामी महाराज आपण पूर्ण अवतारी आहात.. आता मला हि पूर्ण खात्री पटली आहे..!! ”. त्या नंतर तो आपल्या गावी गेला.. अतिशय कौतुकाने स्वामी च्या लीलांचे तो गुणगान गावू लागला.. पुढे तो अधून मधून सर्व कुटुंबाला घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी येत.. आणि स्वामी सुद्धा त्याला मोठ्या प्रेमाने दर्शन देत !!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
स्वामी भक्त हो !! माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कुठल्या अमुक अमुक धर्माचा आहे असा शिक्का मारून जन्माला येत नाही.. धर्म तर मानवाने निर्माण केलेले आहेत.. परंतु जेव्हा तो जन्माला येतो तेव्हा त्याच्या अंतर्मनात मागील जन्मातील कर्माचे ठसे कोरलेले असतात.. आणि त्या अनुशंघाने ह्या जीवनात एक पात्र निभावत असतो… अर्थात आजच्या लीलेत स्वामींनी लीला करत एका इस्रायल धर्माच्या व्यक्तीला तु डॉक्टर पात्र निभावत आहेस आणि इतकेच नव्हे तर डोळ्यांचा डॉक्टर पात्र निभावत आहेस हे अंत:साक्षित्वाने ओळखून… हेच सांगितले कि , कोणी कोणत्याही धर्माचा असू दे.. मग त्याचे पूर्व कर्म.. पूर्व प्रारब्ध बोला.. पूर्व संचित बोला.. हे सर्व काही स्वामींना माहित आहे.. कारण ह्या विश्वात ईश्वर एकच आहे.. प्रत्येकाच्या कर्माचे फळ देणारी शक्ती एकच आहे आणि त्या शक्तीचे अनेक नावे आहेत आणि आज आपण त्या शक्तीला श्री स्वामी समर्थ असे म्हणतो आहे.. थोडक्यात आज आपणास आजच्या पिढी साठी स्वामी हाच संदेश देत आहेत कि, एकच शक्ती आहे.. आणि ह्याच शक्तीने अक्कलकोट येथे मानवशरीर हे समस्त मानवाच्या कल्याणासाठी धारण केले.. म्हणून हि स्वामी शक्ती कोणा एका धर्माचे होत नाही.. आणि स्वामींच्या ह्या मानव शरीर अवताराचा उद्देश असा कि , मानवाच्या जीवनात त्याच्या पूर्व कर्माच्या अनुशंघाने दु:ख वा संकटे येत असतात.. आणि मानव हतबल होऊन आपल्या पूर्व प्रारब्ध वा संचीतावर सोडून देतो आणि निष्क्रिय होऊन.. मनाचा गुलाम होतो.. कुत्रिम जीवन जगतो.. अर्थात तो ईश्वराचा अंश आहे.. तो स्वामींचा बाळ आहे.. हि दिव्य समज देवून.. त्यात दिव्य विश्वास जागृत करून.. त्याच्या मनात अनन्य भक्तीचा संचार करून.. तो मायेतून मुक्त होऊन त्याने आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करावी.. ह्या साठी हि शक्ती विविध युगात सगुण रुपात येऊन विविध लीला करत आहे.. स्वामी भक्त हो !! बघा !! आजच्या लीलेत इस्रायल धर्माचा डॉक्टर सहकुटुंब स्वामींचा भक्त बनतो.. स्वामींच्यासाठी सर्व सारखेच आहेत.. स्वामी सर्व मानवजातीला मायेच्या चुकीच्या धारणातून मुक्त करून त्यांस अनन्य भक्तीचा.. अतूट अभेद्य श्रद्धेचा उपहार देवुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी आलेले आहेत असो. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामी राया !! ह्या पृथ्वीवर मानवा मानवात असलेली धर्माची भिंत उध्वस्त कर.. प्रत्येकाला ईश्वर एकच आहे हि समज दे.. प्रत्येक मानव हे एकाच ईश्वराचे बाळ आहे ह्याचे ज्ञान दे.. आणि सर्वामध्ये बेशर्त प्रेमाचे नाते निर्माण करून.. पृथ्वीवर तुझे शांतीचे आनंदाचे साम्राज्य अभिव्यक्त कर..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News