मेडिकव्‍हर हॉस्‍पिटल मध्ये झाले हपलो (Haplo) बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट

Jul 31, 2021

डॉ.नीलेश वासेकर व त्‍यांच्‍या टीमची यशस्‍वी कामगिरी

नाशिक : नाशिक येथील मेडिकव्‍हर हॉस्‍पिटलमध्ये प्रथमच बोन मॅरो ट्रान्‍सप्‍टांटची (अस्‍थी मज्‍जा प्रत्‍यारोपण) झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देतांना मेडीकव्हर हॉस्पिटल चे एमडी डीएम डॉ निलेश वासेकर म्हणाले की, अकरा वर्षाच्‍या राजेंद्रला दुर्धर रक्‍ताच्‍या कर्करोगाचे निदान झाले. तब्‍बल दोन वर्षे घेऊनसुद्धा आजाराने पुन्‍हा ग्रासल्‍याने बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांटचा एकमेव पर्याय उरलेला होता. या शस्‍त्रक्रीयेसाठी दुदैवाने त्‍यांच्‍या कुटुंबातील कुठल्‍याही सदस्‍याचे वैद्यकीय नमुने राजेंद्रच्‍या नमुन्‍यांशी जुळले नाहीत. अशा परीस्‍थितीत हपलो (Haplo) बोन मॅनो ट्रान्‍सप्‍लांट करण्याचा सल्‍ला रुग्‍णाच्‍या कुटुंबियांना दिल्‍याचे डॉ.वासेकर यांनी सांगितले. अशा प्रकारच्‍या शस्‍त्रक्रीयेत स्‍टेमसेल्‍स (एचएलए) अर्धा मॅच झालेला असला तरी चालतो. कुटुंबियांनी होकार दिल्‍यानंतर रुग्‍णाच्‍या वडीलांकडून स्‍टेमसेल्स देण्यात आल्‍या. या उपचार प्रक्रियेदरम्‍यान रुग्‍णाचा डब्‍ल्‍यूबीसी काऊंट बरेच दिवस शंभरच्‍या खाली होता. साधारणतः शस्‍त्रक्रीयेच्या चौदा दिवसांनंतर नवीन पेशी पुन्‍हा तयार होत असल्‍याचे वैद्यकीय चाचण्यांतून स्‍पष्ट झाले. गेल्‍या आठवड्यात या रुग्‍णाला हॉस्‍पिटलमधून डिस्‍चार्ज देऊ शकल्‍याचे डॉ.वासेकर यांनी सांगितले.
 या शस्‍त्रक्रीयेसाठी संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. अशा स्‍वरुपाच्‍या गुंतागुंतीच्‍या बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट शस्‍त्रक्रीया आता अशोका मेडिकव्‍हर हॉस्‍पिटलमध्ये शक्‍य झाल्‍याने रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाईकांना दिलासा मिळाला असल्‍याचे डॉ.वासेकर म्‍हणाले.
 डॉ. सुशील पारख, बालरोग तज्ञ आणि वैद्यकीय संचालक, मेडिकव्हर नाशिक, म्हणाले की ज्या मुलांना अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे एक आदर्श ठिकाण आहे जे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह संपूर्ण अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
 रितेश कुमार, सेंटर हेड, मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक, म्हणाले की , समाजातील प्रत्येक व्यक्तीला उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पोचवण्याच्या बाबतीत मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक नेहमीच आघाडीवर असते. नाशिककरांना आमच्या सुविधेचा लाभ मिळाला पाहिजे. 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News