6 सप्टेंबर रोजी मालेगावत पेन्शन अदालत

Aug 20, 2021

मालेगाव : सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे प्रामाणिकपणे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमितपणे पेंशन अदालत आयोजन केले जाते. यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्टाचे संबंधित अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात. त्यांच्या तक्रारींची दखल घेवून त्या लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात. भारतीय टपाल खाते 6 सप्टेंबर 2021 रोजी अधिक्षक डाकघर, मालेगाव विभाग मालेगाव यांच्या कार्यालयात 11 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करीत आहे. अशी माहिती अधिक्षक डाक घर मालेगाव विभाग, मालेगाव यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन (पेंन्शन) संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवडयाच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची या डाक पेन्शन अदालत मध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्तराधिकारी तथा धोरनात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंन्शन अदालत मध्ये विचारात घेतली जाणार नाही. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा.  उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नांव, हुद्दा इत्यादी संबंधितांनी पेशन बाबतची आपली तक्रार संबंधितानी अधिक्षक डाकघर, मालेगाव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात अतिरिक्त प्रतीसह 4 सप्टेंबर 2021 अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही असे आवाहन अधिक्षक डाकघर, मालेगाव विभाग मालेगाव यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News