सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे :कृषि संचालक विकास पाटील

Aug 26, 2021

नाशिक : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पीके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्याक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक विकास पाटील यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्याक्षिकांसाठी अर्ज करतांना संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क करून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने करण्यात येणार असून, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य व गळीत धान्य हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यामध्ये कडधान्य हरभरा हे पीक तर सोलापूर, बीड, नागपुर या जिल्ह्यात गहू, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यामध्ये भरडधान्य पीकांमध्ये मका त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगाली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य आणि सांगली, बीड, लातूर, उस्मनाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, वा‍शिम, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गळीतधान्य अशी पीके घेण्यात येणार आहे.

बियाणे वितरणांतर्गत वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास २५ रुपये प्रती किलो, १० वर्षावरील वाणास १२ रुपये प्रती किलो, संकरीत मका ९५ रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास ३० रुपये प्रती किलो, १० वर्षावरील वाणास १५ रुपये प्रती किलो, करडई बियाण्यासाठी ४० रुपये प्रती किलो, गहू बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास २० रुपये प्रती किलो, १० वर्षावरील वाणास १० रुपये प्रती किलो असे एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय तसेच प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे, अशी माहिती कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार २००० ते ४००० रूपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून, संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य असणार आहे, असे ही कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News