शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्यावत करावा :जिल्हा सांख्यिकी अधिकरी प्र.त्रं.पोळ

Aug 26, 2021

नाशिक : शासकीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती https://des2.mahaonline.gov.in/CGE या संकेतस्थळावर अद्यावत करावी, अशा सुचना जिल्हा सांख्यिकी अधिकरी प्र.त्रं.पोळ यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून दिल्या आहेत.

शासकीय प्रसिध्दीपत्रकात नमुद केल्यानुसार, नियोजन विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये शासनाच्या सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2021 तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 1 जुलै 2021 या तारखेस आपल्या आस्थापनेवर वेतन घेत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सादर करावयाची आहे. त्यासाठी युझर आयडी म्हणून दहा अंकी DDO कोड व emdb2016 हा मागील वर्षाचाच पासवर्ड कायम ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकरी श्री. पोळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

सदर माहिती नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र -1 जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून 15 नोव्हेंबर 2021 पुर्वी प्राप्त करून, हे प्रमाणपत्र डिसेंबर 2021 च्या देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याबरोबर माहिती सादर केल्यानंतर त्रुटी आढळुन आल्यास त्याबाबत 15 फेब्रुवारी 2022 पुर्वी निराकरण करून प्रमाणपत्र-2 प्राप्त करून ते मार्च 2022 च्या वेतन देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. वरील प्रमाणपत्र अनुक्रमे नोव्हेंबर 2021 व माहे फेब्रुवारी 2022 च्या वेतन देयकास जोडल्याशिवाय ही वेतन देयके जिल्हा कोषागार तसेच उपकोषागार कार्यालयात स्विकारण्यात येणार नाही. याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घेऊन तात्काळ माहिती सादर करावी. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0253-295246 व ईमेल आयडीdso.nshik@gmail.com यावर संपर्क साधावा, असेही जिल्हा सांख्यिकी अधिकरी श्री. पोळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News