नाशिकच्या मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये कार्डिओलॉजिस्ट नवीन तंत्रज्ञान उपलब्ध

Aug 29, 2021

नाशिक : नाशिक येथील मेडीकव्हर हॉस्पिटलने अत्याधुनिक सुविधा देत गंभीर प्रकृतीच्या रुग्णाला तातडीने सेवा मिळतील अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला जीवनदान देण्यात वैद्यकीय तज्ञांना यश आले आहे. ८५ वर्षीय पुरुष रुग्णांच्या , छातीत दुखण्याच्या तक्रारीसह तसेच श्रमिक सिंकोप म्हणजेच तात्पुरते मेंदूला रक्तपुरवठा कमी होणाच्या तक्रारीं मुळे मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना तीन महिन्यांपूर्वी स्ट्रोक झाल्याचा इतिहास होता. त्याच्या तपासात, ईसीजी उंचावलेल्या ट्रॉप टी सह हे कार्डियाक इजा असल्याचे लक्षण आढळून आले २४ तासाच्या परीक्षणानंतर रुग्णाला वेन्ट्रिक्युलर टॅकी कार्डिया असल्याचे स्पष्ट झाले.
त्यांच्या कोरोनरी अँजिओग्राफीत ९० टक्के लांबीचे सेगमेंट कॅल्सीफाईड स्टेनोसिस दिसून आले. व्हीटी, स्ट्रोकच्या पार्श्वभूमीच्या इतिहासासह गंभीर स्टेनोसिस लक्षात घेता, त्यांना अचानक हृदयविकाराचा उच्च धोका होता म्हणून त्यांना हृदयातील गंभीर अडथळे दूर करण्यासाठी त्वरित उपचार करणे आवश्यक होते. ते तंदुरुस्त नव्हते आणि बायपास शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हते. त्यामुळे फक्त एक पर्याय शिल्लक होता तो म्हणजे अँजिओप्लास्टी. पण लांब भाग, अधिक घनतेचे कॅल्सीफाईड स्टेनोसिस (कॅल्सिफाइड स्टेनोसिस/ब्लॉकेज उघडणे अवघड आहे), हे पाहता अँजिओप्लास्टी देखील आव्हानात्मक होती.
नाशिक येथील मेडीकव्हर हॉस्पिटलचे एमडी डीएम, डॉ सचिन कुमार पाटील म्हणाले की आम्ही आयव्हीएल कोरोनरी इंट्राव्हास्कुलर लिथोट्रिप्सी सह अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. आयव्हीएल बलून हा सोनिक प्रेशर वेव्हचा लहान स्फोट तयार करून काम करतो. आयव्हीएल बलून वापरून त्यांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये वरवरचे आणि खोल कॅल्सीफिकेशन कापणे आम्हाला शक्य होते.त्यांच्या अँजिओप्लास्टी दरम्यान आम्ही आयव्हीएल बलून, ३ एनसी बलून, २ मेडिकेटेड स्टेंट वापरले. ही प्रक्रिया २ तास चालली आणि आम्ही तिसऱ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज दिला. ते पूर्णपणे लक्षणांपासून मुक्त होते नाशिकमध्ये अशा प्रकारची ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची शस्त्रक्रिया १०० पेक्षा कमी झाल्या आहेत. ही शस्त्रक्रिया करताना डॉ जयदीप राजेबहादुर सह स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम होती.
मेडीकव्हर हॉस्पिटल चे बालरोगतज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ.सुशील पारख म्हणाले की अश्या लोकांना ज्यांना ह्रदयाचा त्रास सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी मेडीकव्हर हॉस्पिटल हे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले एक हॉस्पिटल आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटल चे केंद्र प्रमुख रितेश कुमार म्हणाले की समाजातील प्रत्येक व्यक्तीला उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्याच्या बाबतीत मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक नेहमीच आघाडीवर असते. नाशिकच्या लोकांना आमच्या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त मिळाला पाहिजे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News