नाशिकच्या अण्णा शिंदे व सहयोगी गोंधळी यांना मिळाला सेवेचा मान
नाशिक : साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्ध पिठ म्हणजे वणी गडावरील सप्तश्रृंगीमातेच्या नवरात्रोत्सवाच्या आज पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी मातेच्या विशेष पुजा म्हणून पारंपारिक दागिन्यांची मिरवणूक गोंधळी समाजाच्या हस्ते गोंधळ व संभळ वादय वाजवून करण्यात आली. नाशिकचे गोंधळी अण्णा शिंदे व त्यांचे सहयोगी प्रथमेश शिंदे, युवराज गोंधळी, सागर गोंधळी यांनी विविध पारंपारिक देवीचे गाणे गात संभळाच्या तालावार नांदूरीगड दुमदुमून निघाला.यावेळी सप्तश्रृंगी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
परंपरेनुसार सप्तश्रृंगी मातेची नवरात्री काळात विशेष पुजा करुन घटस्थापना केली जाते. त्यातील महत्वाचे म्हणजे लक्षवेधी ठरते ते देवीचे श्रृंगार व अलंकार पुजा.देवीचे पारंपारिक दागिन्यांना तेजस्वी लखलखीत करुन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढून गडावर आणले जाते.






