संस्थाचे कार्य उल्लेखनिय, चांगले काम करणाऱ्या संस्थाना कायमच सहकार्य केले जाईल – नाशिक रनचे सरचिटणीस अनिल दैठणकर
नाशिक :– १०५ वर्षाची वाटचाल असेलेल्या नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेला नाशिक रन या चारिटेबल ट्रस्ट कडून ५३२०००/- रूपये किंमतीच्या ज्युडो मॅट देणगी रूपाने देण्यात आल्या. सदर मॅट पतियाळा येथून खरेदी केल्या आहेत. आज या ज्युडो मॅटचे उद्घाटन नाशिक रन संस्थेचे सरचिटणीस अनिल दैठणकर, खजिनदार श्री कासार आणि श्री नितीन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या मॅट उपलब्ध करून दिल्यामुळें खेळाडूंचे २० वर्षा पासूनचे स्वप्न साकार झाले आहे.

यशवंत व्यायाशाळांमध्ये ज्युडो मॅटचे उ्घाटन करतांना नाशिक रन संस्थेचे पदाधीकारी अनिल दैठणकर, कासार, नितीन देशमुख. सोबत यशवंत व्यायामशाळेचे पदाधीकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू.
यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे पदाधीकारी अविनाश पाटील, रघुनाथ महाबळ आणि दीपक पाटील यांनी यशवंत व्यायाम शाळेच्या कार्याची माहिती मान्यवरांना दिली. यशवंत व्यायाम शाळेमध्ये पारंपारीक व्यायामबरोबरच आधुनिक पद्धतीचा व्यायाम, मल्लखांब, योगासने, जिमनॅस्टिकस, टेबल टेनीस, बॅडमिंटन, महिला जिम, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अश्या विविध खेळासाठी सुविधा आहेत. आपल्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अश्या प्रकारच्या मदतीमुळेच संस्थेच्या खेळाडूनां राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणे शक्य होत आहे असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी अनिल दैठणकर, खजिनदार कासार आणि देशमुख यांनी व्यायामशाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलतांना अनिल दैठणकर यानी सांगितले की एखादी अँक्टिव्हिटी सुरू करणे सोपे आहे, परंतु ती टीकवून ठेवणे आणि त्यामध्ये वेळोवेळी वाढ करणे हे जास्त महत्वाचे आहे. हे सातत्य यशवंत व्यायाम शाळेच्या बाबतीत लागू होते आहे असे सांगून व्यायामशाळेच्या कार्यकारीणीने जुन्या परंपरेला फाटा न देता कुस्तीचा आखाडा, मल्लखांब, योगा, पारंपारीक व्यायाम ही परंपरा कायम ठेवून जिमनॅस्टिकस, टेबल टेनीस, बॅडमिंटन, जुदो, महिलांसाठी जीम, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांची सुविधा केली आहे, यामध्येच यशवंत व्यायाम शाळेच्या या १०५ वर्षाच्या वाटचालीत मनापासून काम करण्याची वृत्ती दिसुन येते असे सांगितले.
या पुढेही यशवंत व्यायाम शाळेला नाशिक रनतर्फे सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी वेळी यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, कार्यकारिणी सदस्य अविनाश पाटील, डॉ. जयराम महाबळ, प्रशांत गायकवाड, प्रशिक्षक योगेश शिंदे, स्वप्निल शिंदे, सुहास मैद , संदिप शिंदे, शशांक वझे, विनायक दंडवते आणि खेळाडू उपस्थित होते.





