नाशिक, : अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील उद्योजकांसाठी केंद्र शासनाच्या स्टँण्ड अप इंडिया योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सबसिडीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण सुंदरसिंग वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.शासकीय प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील उद्योजकांसाठी सदर योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेकडून स्टँण्ड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर होते. उर्वरित फ्रंट एंड सबसिडी स्वरूपात नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते.जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउद्योजकांनी याबाबत अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण नाशिक कार्यालयात संपर्क साधावा, असेही सहायक आयुक्त समाज कल्याण सुंदरसिंग वसावे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





