- वेदांतूच्या लाइव ऑनलाइन क्लासेस मध्ये अभ्यास करणाऱ्या १५०० विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ मध्ये केले उत्कृष्ट प्रदर्शन
- अंदाजे 60% विद्यार्थी टियर 3 आणि 4 शहरांचे
- वेदांतूचे निवड गुणोत्तर 12.5% आहे,जे राष्ट्रीय सरासरी 3.5% पेक्षा 3X जास्त आहे.
नाशिक: वेदांतू या भारतातील आघाडीच्या लाइव ऑनलाइन शिकवणी कंपनीने आज जाहीर केले की त्यांचे 6% विद्यार्थी आयआयटी च्या आगामी बॅचमध्ये असतील. वेदांतूच्या प्लॅटफॉर्मवर 1500 हून अधिक विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड 2021 मध्ये घरबसल्या शिकत आहेत, त्यापैकी 60% विद्यार्थी टियर 3 आणि 4 शहरांतील आहेत. वेदांतूचे निवड गुणोत्तर 12.5% आहे, जे राष्ट्रीय सरासरी 3.5% पेक्षा 3X जास्त आहे.
संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांनी वेदांतूच्या प्लॅटफॉर्मवर जेईई अॅडव्हान्स्ड 2021 साठी तयारी केली आणि त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली. मास्टर टिचर्ससह लाइव्ह क्लासेसमध्ये शिकण्या पासून, अभ्यास साहित्य, चाचण्या आणि असाइनमेंटपर्यंत तसेच थेट शंका निरसन झाल्याने विद्यार्थी त्यांच्या घरीच सुरक्षित राहून शिकत राहू शकले आहेत. या वर्षीच्या टॉप १००० विद्यार्थ्यांपैकी ५% विद्यार्थी हे वेदांतूचे विद्यार्थी असतील.
सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षण प्रत्येकासाठी उपलब्ध करून देणे हा वेदांतूचा दृष्टीकोन आहे आणि विद्यार्थ्यांना अखंड शिक्षणाचा अनुभव घेता यावा यासाठी वेदांतु वचनबद्ध आहे. वेदांतूच्या मुख्य शिक्षकांच्या प्रयत्नांनी आणि सशक्त शैक्षणिक सामग्रीमुळे 50 विद्यार्थी टॉप 1000 आणि 550 टॉप 10000 म्हणून निवडले गेले.
“आम्ही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो ज्यांनी हे सिद्ध केले आहे की एकत्रितपणे आम्ही शिक्षणाचे भविष्य घडवू शकतो. जेईई अॅडव्हान्स्ड ही सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे आणि आम्ही अनेक वर्षांमध्ये क्युरेटेड लाइव्ह ऑनलाइन शिक्षण देऊन खूप प्रगती केली आहे ज्यामुळे अनेक जेईई इच्छुकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत झाली आहे. हे सर्व विद्यार्थी आणि आमच्या मुख्य शिक्षकांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीचा परिणाम आहे.” असे आनंद प्रकाश, को-फाउंडर अँड अकॅडेमिक हेड – वेदांतू यांनी सांगितले.




