आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण; इच्छुकांसाठी 26 नोव्हेंबरला होणार मुलाखती : श.बा.जाधव

Nov 23, 2021

नाशिक : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, कळवण मार्फत स्पर्धात्मक परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्याकरीता आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी उमेदवारांची निवड 26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता कळवण येथे मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श.बा. जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 1 डिसेंबर 2021 पासून पुढील साडेतीन महिने कालावधीकरीता असणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे अशी असून, शैक्षणिक अर्हता किमान 12 वी पास असणे आवाश्यक आहे. या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना रूपये 1 हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येतांना स्वत:चे 12 वी पास गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत तसेच एक पासपोर्ट साईजचा फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना त्यांची रहाण्याची व भोजनाची सोय स्वत: करावी लागणार आहे व यासाठी कोणातही प्रवासखर्च उमेदवारांना देय असणार नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

यापुर्वी प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी पुन्हा अर्ज सादर करू नये. या प्रशिक्षणांतर्गत शिपाई, लिपिक, ग्रामसेवक, तलाठी अशा वर्ग 3 व वर्ग 4 तसेच इतर पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या परिक्षांबाबत तयारी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जुने तहसिल कार्यालय आवार, नेहरू चौक, तालुका कळवण, जिल्हा नाशिक, पिनकोड 423501 या ठिकाणी वेळेत हजर रहावे, तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचा 02592-299973 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही मार्गदर्शन अधिकारी श.बा. जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News