10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यानां कृषी प्रवेशाची सुवर्णसंधी : सहयोगी अधिष्ठाता विश्वनाथ शिंदे

Nov 26, 2021

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 30 नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

मालेगाव :  तालुक्यातील काष्टी येथे महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सुरु होत असलेल्या कृषी विज्ञान संकुलातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असल्याची माहिती कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता विश्वनाथ शिंदे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

कृषी तंत्रनिकेतन पदविका ही तीन वर्षासाठी असून सहा सत्रात इंग्रजी माध्यमातून असेल असे श्री. शिंदे यांनी सांगितले आहे. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेची मुदत 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत असून विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश प्रक्रीया करुन घेणेबाबत आवाहनही केले आहे.

कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी सलग्न पदवीच्या अभ्यासक्रमाला थेट व्दितीय वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले आहे. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा अर्ज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या www.mpkv.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून प्रवेश माहिती पुस्तीकेची प्रत काढून ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. प्रवेश अर्ज प्राचार्य, कृषी तंत्रनिकेतन, मालेगाव कॅम्प या ठिकाणी किंवा इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज त्या – त्या घटक कृषी विद्यालयाच्या प्राचार्यांकडे जमा करावेत. प्रवेश संदर्भात अधिक माहितीसाठी 9423784535 किंवा 7972276106 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News