नाशिक राज्यशासनाच्या अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास आणि रोजगार व उद्योजकता यांच्यामार्फत 12 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान महास्वयंम वेबपोर्टलवरून ऑनलाईन पध्दतीने राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यासाठी हा रोजगार मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यामध्ये इयत्ता 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच बी.ई. व बी.टेक. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवा योजना नोंदणी केली नसेल अशा उमेदवारांनी महास्वयंम वेबपोर्टलवरून www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्या पात्रतेप्रमाणे उपलब्ध जागांसाठी अर्ज सादर करावे, अशा सूचनाही सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिल्या आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असून संपूर्ण राज्यातील नामांकित उद्योग व व्यवसाय या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, हायर ॲपलायन्सेस, महिंद्रा सीआय ई ऑटोमोटीव्ह लिमिटेड, आरएसबी ट्रान्समिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक प्लांट, ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंट प्रायवेट लिमिटेड इत्यादींसारख्या नामांकित कंपन्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील कंपन्या या मेळाव्यात
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




