‘केंब्रिज लर्नर अवॉर्ड्स’ घोषणा ; महाराष्ट्रातील १६ विद्यार्थ्यांनी जिंकला पुरस्कार

Dec 13, 2021

नाशिक : केंब्रिज इंटरनॅशनलने २०२०- २१ साठीच्या प्रतिष्ठित ‘केंब्रिज लर्नर अवॉर्ड्स’ विजेत्यांची घोषणा केली आहे. यावर्षी १५० भारतीय विद्यार्थ्यांनी २०२०- २१ या सत्रासाठीचे अत्यंत प्रतिष्ठीत असे तब्बल ११७ ‘आउटस्टँडिंग केंब्रिज लर्नर अवॉर्ड्स’ आपल्या नावे केले आहेत. आउटस्टँडिंग केंब्रिज लर्नर अवॉर्ड्स हे जगभरातील केंब्रिज परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या असामान्य कामगिरीचे मानक आहेत. या पुरस्कारांच्या माध्यमातून केंब्रिज आयजीसीएसई आणि केंब्रिज इंटरनॅशनल एएस आणि ए दर्जाच्या विषयांच्या विस्तृत श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या कामगिरींचा गौरव केला जातो.
जागतिक पातळीवरील हे पुरस्कार विद्यार्थ्यांच्या यशाला चार श्रेणींमध्ये मान्यता देतात टॉप इन द वर्ल्ड , टॉप इन कंट्री , हाय अचिव्हमेंट अवॉर्ड आणि ‘बेस्ट एक्रॉस सब्जेक्ट्स’. हे पुरस्कार जिंकणाऱ्या देशभरातील १५० अद्वितीय विजेत्यांपैकी ५७ विजेते महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांनी ‘टॉप इन कंट्री’, १६ विद्यार्थ्यांनी ‘टॉप इन द वर्ल्ड’, ११ विद्यार्थ्यांनी ‘हाय अचिव्हमेंट अवॉर्ड’ आणि पाच विद्यार्थ्यांनी ‘बेस्ट एक्रॉस सब्जेक्ट्स’ पुरस्कार पटकावले आहेत.
एकंदरीत, भारतातील ४२ विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिष्ठित असा ‘टॉप इन द वर्ल्ड’ पुरस्कार मिळवला आहे. ‘जगभरातून उत्कृष्ट’ म्हणजेच ‘टॉप इन द वर्ल्ड’ हा पुरस्कार विशिष्ट विषयात जगभरातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो. याव्यतिरिक्त, भारतातील ६५ जणांनी ‘टॉप इन कंट्री’ पुरस्कार आणि १७ जणांनी बेस्ट एक्रॉस सब्जेकट्स’ पुरस्कार जिंकला आहे.
केंब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशनच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रादेशिक संचालक महेश श्रीवास्तव म्हणाले की अलीकडच्या काळात झालेल्या परीक्षांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या भारतभरातील आमच्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. अशा आव्हानात्मक वर्षात त्यांनी जे काही साध्य केले आहे, ते सर्व अविश्वसनीय आहे. महासाथीच्या रोगाने जगभरातील अध्यापन आणि शिक्षण क्षेत्रात आलेले व्यत्यय अद्याप सुरुच आहेत. सोबतच, यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही मोठ्या अनिश्चितता निर्माण झाल्या आहेत. तरीही, आमच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या आव्हानांवर मात करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले आणि त्यांचे शिकवण्यावर व शिकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News