लहान मुलांमधील अपंगत्व निर्मूलनसाठी आम्ही कायम तत्पर –  डॉ.निखिल चल्लावार

Dec 19, 2021

लहान मुलांमधील जन्मजात अस्थिव्यंगाचे आजार आणि उपचार या विषयावर विशेष परिसवांदात प्रतिपादन

नाशिक -“जागतिक दिव्यांग दिवस” हा ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणे म्हणजे अपंग व्यक्तींना सन्मानाने वागवणे आणि त्यांच्या आयुष्यात देखील आनंदाचे क्षण फुलवणे, हा मुख्य उद्देश समोर ठेऊन जनजागृती अभियान व विविध उपक्रम राबून हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात  साजरा केला जातो. जगभरात १०० कोटीहून जास्त दिव्यांग आहेत, त्यापैकी १९ कोटी दिव्यांगाचे वय १५ वर्षाहुन कमी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हे प्रमाण ३.८ टक्के आहे आणि दिवसागणिक याची संख्या वाढत असल्याचे संयुक्त राष्टाने म्हंटले आहे ,

जागतिक दिव्यांग दिवस या निमित्ताने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे लहान मुलांमधील जन्मजात अस्थिव्यंगाचे आजार आणि उपचार या विषयावर विशेष परिसवांदाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ निखिल चल्लावार हे  उत्तर महाराष्ट्रातील एकमेव लहान मुलाचे ‘अस्थीरोग शस्त्रक्रिया तज्ञ्’ आहेत, आणि गेली सात वर्षांपासून डॉ चल्लावार हे नाशिक मध्ये अपंग मुलांची देखभाल व त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करत आहेत त्यांना या सामाजिक कार्यासाठी अत्यधुनिक उपकरणे व साधने प्राप्त व्हावीत यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने हि सामाजिक जवाबदारी स्वीकारली, जे उपचार यापूर्वी फक्त मोठ्या महानगरामध्ये आणि परदेशात उपलब्ध होती, याची उणीव नाशिक शहरात कायम जाणवत होती म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने लहानमुलांमधील अपंगत्व निर्मूलनाचा ध्यास मनाशी घेतला. विशेष सांगाव्याचे झाल्यास हि सेवा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचेल आणि सामान्य जनतेला परवडेल याची विशेष काळजी घेतली आहे. त्याच प्रमाणे ‘आरोग्य सामाजिक विभाग ‘ रुग्णालयात सुरु केला आहे जेणेकरून आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठी हा विभाग देशभरातून अनेक सामाजिक संस्थे कडून या लहान मुलांसाठी शस्त्रक्रिया साठी निधी उभारता येईल आणि त्या रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णावर उपचार घेणे सोपे जाईल त्या मुळे हि सेवा  सुरु झाल्याने उत्तर महाराष्टातील  रुग्णांना मुंबई महानगराची धावपळ आता टळणार आहे,
या विशेष परिसंवादात डॉ निखिल चल्लावार यांनी रुग्ण आणि त्यांचे नातेवाई यांच्याशी संवाद साधताना समृद्ध शरीर म्हणजे समृद्ध आयुष्य आणि धष्टपुष्ट शरीर हि देवाची देणगी आहे असं आपण ग्राहय धरून चालतो. पण याची खरी किंमत हि एका अपंग व्यक्तीला माहिती असते त्याला हि देणगी लाभलेली नसते. जन्मजात अस्थिव्यंगाचे आजार हे समाजामध्ये आज पर्यन्त  देवाचा प्रकोप मानला जाई, परंतु आधुनिक विज्ञानाने नवीन तंत्राच्या साहाय्याने या अपंगावर यशस्वी रितिने मात केली आहे, लहान मुलांमधील या व्याधी निवारण होण्यासाठी देशभरातील सामाजिक संस्था या पुढे सरसावलेल्या आहेत असामान्य परिस्थिती मध्ये आर्थिक कारणाने बहुतांश लहान मुलांवर उपचार होत नाहीत हाच दुवा घेऊन अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल ने अशा लहान मुलांना शोधून त्यांच्यावर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत यात अवघ्या ५ वय वर्ष असणाऱ्या मुलावर टीबीया स्युडो आर्थोसिस या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आली यासाठी The Baby Care Foundation या सामाजिक संस्थेने आर्थिक मदत केली आहे त्याच प्रमाणे ऑस्टिओजेनेसिस ईपरफ़ेक्ट या अनुवांशिक विकारामुळे हाडे नाजूक होतात आणि सहज तुटतात हा विकार सौम्य आणि गंभीर असू शकतो सोप्या शब्दात सांगावयाचे झाल्यास शरीरात अपूर्ण हाडाची निर्मिती होते या विकारात शस्त्रक्रिया करण्याची गरज लहान मुलांना पडते अश्याच एका वय वर्ष अकरा असणाऱ्या लहान मुलाची शस्त्रक्रिया अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल येथे करण्यात आली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती असामान्य आसल्या कारणाने Child Help Foundation या संस्थेने शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि या लहान मुलावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली .

लहान मुलामध्ये खालील लक्षणे आढळल्यास मुलांच्या पालकांनी त्वरित अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलशी संपर्क साधावा
१. जन्मापासून हात पाय आणि अंग विकृत असणे
२. हात अथवा पायात वाक असणे.
३. मुलांच्या हाताच्या,पायाच्या हालचाली सुरळीत होत नसल्यास
४. जन्मापासून हात किंवा पाय न हलवणे
५. १८ वर्ष वयोगटाखालील मुलांमध्ये फ्रॅक्चर असणे.
६. हाताची, पायाची लांबी एकसारखी नसणे

– ह्या गोष्टी निश्चित लक्षात ठेवा : 
१.  बाळाच्या आणि लहान मुलांच्या विकृतींवर उपचार आहेत.
२  विकृती घालवण्यासाठी बाहेरच्या शहरात अथवा देशात जाण्याची आवश्यकता नाही.
३  आता आपल्या शहरात उपचार उपलब्द्ध आहेत.
४  विकृती लक्षात आल्यावर त्वरित उपचार सुरु करावेत.
५  जेवढ्या लवकर उपचार होतील तेवढ्या लवकर अडचणी कमी होतात

सुधारित समाज किंवा देश आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा समाजातील एकही घटक स्वतःला हीनदीन समजता कामा नये. प्रत्येक अपंग मनुष्यात स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि स्वकष्टाने त्यांनाही आयुष्य जगता आले पाहिजे. तेव्हाच जागतिक अपंग दिवस साजरा करण्याचे कारण मिळू शकेल.
यासप्रसंगी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल चे मुख्य व्यवस्थापक रितेश कुमार , मार्केटिंग हेड स्वप्नील आवळे , व रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली योग्य ते निदान व उपचार केले जातात.ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल  होऊन औषधोपचारांची गरज असेल त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आणि उच्च शिक्षित वैद्यकीय स्टाफ च्या देखरेखेखाली उपचार केले जातात.आधुनिक सुखसोयी आणि तंत्रज्ञान यांचा जोड असलेले अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे रुग्णांसाठी सर्वसमावेशक पर्याय म्हणून काम करत आहे
– श्री रितेश कुमार (मुख्य व्यवस्थापक, अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News