आरोग्यम धनसंपदा कार्यशाळेतून मधुमेह, स्थुलता निरावरणाचे धडे

Jul 8, 2019

योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा – विश्वासराव मंडलिक

नाशिक :- योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा त्यात पदवी मिळवावी व आपल्यासोबत इतरांनीही त्याचे मार्गदर्शन करावे असे।आवाहन पंतप्रधान योग पुरस्कार विजेते विश्वास मंडलिक गुरुजी यांनी केले. आज  परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार येथे योग विद्या धामच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस पमुख पाहुणे नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मनोहर कानडे,ओंकार नगर (नवीन नाशिक) अध्यक्ष राजेंद्र फड,योगशिक्षिका कांचंनताई खाडे,योगविद्या धामचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पुरी, अमरजीतसिंग गरेवाल, डॉ. विद्याताई देशपांडे,आशाताई वेळूकर,निलेश वाघ, योग शिक्षक व साधक उपस्थित होते.याप्रसंगी किशोर वयीन मुलांसाठी योग व मसाज तंत्र व मंत्र या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी विश्वासराव मंडलिक म्हणाले की, आहारातील बदलामुळे मधुमेह आणि स्थूलतेचे प्रमाण अधिक वाढले असून मधुमेह व स्थूलता निवारणासाठी नियमित योग करण्याची आवश्यकता आहे. योग अभ्यास करण्यासाठी कुठलीही वयाची मर्यादा नसल्याने निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी योगाचे धडे घेऊन इतरांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. किशोर वयात येताना मुलांमध्ये वेगवेगळे बदल होत असतात त्या काळात त्यांची मानसिक स्थिती चांगली राहावी यासाठी योग अभ्यास महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी लक्ष्मीकांत पाटील म्हणाले की, सर्व सामान्यांसाठी योग प्रशिक्षणाची सुविधा योग विद्या धामने उपलब्ध करून दिली आहे. यावेळी निरोगी आरोग्यासाठी योग उपचार संकल्पनेवर आयोजित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.पोलिस दलासाठी योग प्रशिक्षण सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करत. योग आयुष्यात असणे म्हणजे रोग मुक्त आयुष्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजात योग साधक म्ह्णून देखील काम करण्यास आपल्याला आवडेल असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी योग शिक्षकांनी योग आसने, प्राणायाम प्रात्यक्षिके व शुद्दी क्रिया व्यासपीठावर दाखविण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षिका सुवर्ण गौरी चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन ओंकारनगर नवीन नाशिकचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले. नाशिक शहर परिसरात मुसळधार पाऊस असतांना कार्यशाळेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.योग विद्याधाम गुरुकुल तळवाडे येथे साकारण्यात येत असलेल्या साधना मंदिरासाठी कुलगुरू योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांनी पंतप्रधान पुरस्कारातून प्राप्त झालेली २५ लक्ष रुपयांची मदत संस्थेला सुपूर्त केली

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News