|| स्वामी लीला ||
स्वामी महाराज मोहोळ गावात असतांना एक शिल्पकार नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी येई.. स्वामी महाराज कोठे हि असु दे.. ज्या ज्या ठिकाणी स्वामी असतील त्या त्या ठिकाणी हा शिल्पकार जात असे.. आणि तेथे दर्शन घेत असे.. आणि हा त्याचा दररोजचा नित्यक्रम होता.. स्वामी भक्त हो !! त्या शिल्पकारची हि भोळी भाबडी दर्शनाची सेवा न चुकता निरंतरतेने सुरु होती.. आता शिल्पकाराच्या ह्या सेवेला जवळ जवळ चार महिने झाले.. एके दिवशी तो स्वामींच्या दर्शनासाठी आला.. दर्शन घेत असतांना त्याच्या मनात एक विचार आला कि , “ खंडोबा हे आपले मुख्य कुलदैवत आहे.. त्याचे दर्शन व्हावे.. परंतु येथून जेजुरी सुद्धा खूप दूर आहे.. तिकडे जाणे सध्या शक्य नाही.. परंतु खंडेरायाचे दर्शन व्हायला हवे.. !! ” स्वामी भक्त हो !! अनंत कोटी ब्रम्हांड ज्याच्या उदरात नांदत आहेत.. त्या परब्रम्ह स्वामी महाराजांना शिल्पकाराची इच्छा समजली.. आणि स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले “ अरे शिल्पकारा.. इकडे बघ !! तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली आहे.. !! ” आणि त्याच वेळेला शिल्पकाराने स्वामींकडे बघितले असता.. आश्चर्य घडले.. स्वामींनी त्यांस साक्षात खंडोबाच्या रुपात दर्शन दिले.. सद्गुरुस्वामी करुणासागर ! अंतर्साक्षी व्यापक चराचर !! शिवमल्हारी स्वरूप धरूनि सुंदर ! दाविले सहज क्षणमात्रे !! (गुरूलीलामृत अ.१८ ओवी ४९) मग काय विचारता.. शिल्पकार अत्यानंदात नाचुच लागला म्हणा.. स्वामी महाराज आणि शिवमल्हार एकच आहे.. हि खुणगाठ पक्की करून.. तो स्वामींचा जयजयकार करू लागला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| बोध ||
आपले स्वामी कल्पवृक्ष आहेत.. जसे कल्पवृक्षाच्या छायेत राहून आपण जे जे इच्छितो.. ते तत्काळ फलद्रूप होते.. अगदी तसे स्वामींच्या सेवेत राहिले असता… हृदयातील स्वामी भावनेवर राहिले असता.. आपण ज्या ज्या इच्छा इच्छितो.. त्या इच्छांची पूर्तता लागलीच होते.. आजच्या लीलेतून स्वामी महाराज असंख्य बोध देत आहेत.. आज आपल्याला शुद्ध प्रेमभाव असलेला निरंतर सेवाभाव नावाचा गुण धारण करायचा आहे.. बघा !! शिल्पकाराची सेवा अगदी साधी होती.. त्याने काही तप केले नाही.. वा कठोर साधना केली नाही.. वा कोणत्याही पोथ्या पुराणे वाचले नाही वा कर्मकांड केले नाही.. तो मात्र अतिशय शुद्ध प्रेम भावनेने स्वामींच्या दर्शनासाठी जात होता.. आणि हि सेवा तो अखंड निरंतरतेने करत होता.. मग स्वामी कोठेही असू दे.. त्या ठिकाणी जावुन हा शिल्पकार दर्शन घेत.. आणि स्वामींनी त्याच्या मनातील ओळखून खंडोबाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण केली.. स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून बोध घेता.. आपल्याला शुद्ध प्रेमभाव असलेला निरंतर सेवाभाव नावाचा गुण धारण करायचा आहे.. आज आपल्याला कितीही संकट असू द्या वा दु:ख असू द्या.. वा आपले काही धेय्य सध्या करण्याची इच्छा असू द्या.. हे मात्र निश्चित करा.. कि स्वामी महाराज हे असीम अनंत शक्ती आहे.. आणि वर्तमानात हृदयातून सतत मार्गदर्शन करत आहेत.. आपल्याला मात्र ह्या हृदयातील आनंदाच्या.. शांतीच्या.. भक्तीच्या भावनेवर स्थिर रहायचे आहे.. आणि आपल्या धेय्याच्या दिशेने असलेले प्रामाणिक कर्म हे स्वामी सेवेच्या भावनेने निरंतर करत रहायचे आहे.. स्वामी भक्त हो !! कधी कधी नकारात्मक घटना घडतील आणि त्या घटना आपल्याला स्वामी भावनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील.. तेव्हा स्वामी आपली परीक्षा बघत आहेत.. हि समज ठेवून.. पुन्हा दृढ इच्छाशक्तीने हृदयातील स्वामी भावनेवर स्थिर व्हायचे आहे.. आनंदी राहून आपले कर्मच निरंतर सेवाभावनेने करायची आहे.. बघा !! जसे स्वामीनी त्या शिल्पकाराची मनोकामना पूर्ण केली.. अगदी तशीच आपली इच्छा सुद्धा सहज पूर्ण होईल.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या.. “ हे समर्था !! तुला भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते म्हणून हे आई !! आम्हाला काही ज्ञानी बनवू नको वा कोणी पंडित बनवू नको.. आमच्या मुखात तुझे नाम असू दे.. हृदयात तुझे स्मरण असू दे.. आणि आमच्यावर तुझ्या बद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या सेवेची कृपा कर.. तुझी सेवा आमच्याकडून निरंतरतेने करवून घे !! हे परब्रम्हा !! तु माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर.. !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






