अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये भिन्न रक्तगटातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्रक्रिया यशस्वी

Dec 31, 2021

नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे रुग्ण आणि मूत्रपिंडदाता या दोघांचे रक्तगट वेगळे असताना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची शस्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे भिन्न रक्तगटातील मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादी मधील उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी आगोदर मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते परंतु आता हि सुविधा नाशिक मधेच असल्याने आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होणार आहे देशभरात गेल्या काही महिन्यापासून अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया संथगतीने सुरु होती आता मात्र अनलॉक नंतर या प्रक्रिया आता नियमित सुरु झाल्या आहे ,राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमा अंतर्गत नाशिक जिल्यातील ग्रामीण भागातील अनुप्रिया ( नाव बदलले आहे ) वय वर्ष ३३, गेली दोन वर्षापूर्वी मूत्रपिंड निकामी झाले, तेव्हा पासून त्या डायलिसिस वर होत्या त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला होता. किडनी ट्रांसप्लांट विषयक नियमानुसार जवळच्या नातेवाईक पैकी ज्याचा रक्तगट सामान आहे , आशा एका व्यक्तीची मूत्रपिंड प्रत्यारोपण करणे शक्य असते संबंधित व्याख्येनुसार त्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आई , वडील ,भाऊ आणि बहीण यांचा समावेश होतो. परंतु या कुटूंबियात रक्तगट जुळत नव्हता त्यामुळे प्रत्यारोपण करण्यासाठी अडचणी येत होत्या रुग्णाचा रक्तगट बी+ पॉसिटीव्ह आहे त्यांना याच रक्तगटाच्या किडनीची आवश्यकता होती परंतु मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दाता उपलब्ध होत नव्हता , तसेच माहेर व सासर या दोन्ही ठिकाणी मूत्रपिंड प्रत्यारोपणास अनुरूप असा दाता मिळत नसल्याने रक्तगट जुळत नसताना हि शस्त्रक्रिया करता येते का ? याविषयी कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक चे सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉ नागेश अघोर याचा सल्ला घेतला
——————————————————-

वैदकीय शास्रातील प्रगत पद्धतीनुसार आणि भिन्न रक्तगटातील व्यक्तीच्या ” किडनी ट्रांसप्लांट ” विषयक वैद्यकीय उपचार कर्मानुसार ( As Per Medical Protocol )संबंधित बाबी अंमलात आणल्या. ABO ( Incompatible Kidney Transplants ) म्हणजेच भिन्न रक्तगट असणाऱ्या व्यक्ती कडून रुग्णाला मूत्रपिंड अवयव दान करण्यात येते परंतु याप्रकारच्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग उद्भवू नये व अवयव सुरक्षित राहावा म्हणून मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वी रुग्णाला १५ दिवस आधी पासून उपचाराला सुरवात केली जाते या मध्ये रुग्णाच्या शरीरातील विरुद्ध अँटिबायोटिक कमी करण्यात येतात रुग्णाला एक विशिष्ट इंजेक्शन देऊन त्याच्या रक्तात दात्याच्या रक्तगटाप्रमाणे बदल करण्यात आला, जेणे करून नवीन अवयवावर प्रत्यारोपणानंतर कुठल्या हि स्वरूपाचा धोका उत्पन्न होऊ नये.
( डॉ नागेश अघोर, किडनी विकार तज्ज्ञ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक )२१ डिसेम्बर रोजी “मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्रक्रिया अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक” येथे पार पडली या शस्रक्रिया दरम्यान आईची एक किडनी काढून ती मुलीला प्रत्यारोपित करण्यात आली.आईने मुलीला किडनी दान करून समाजापुढे एक अनोखा आदर्श ठेवला आहे. विसंगत रक्तगटाची ” मूत्रपिंड प्रत्यारोपण “करण्याची हि नाशिक विभागातील पहिली भिन्न रक्तगट असणारी शस्रक्रिया अशोका मेडाकव्हर हॉस्पिटल नाशिक मध्ये यशस्वीरित्या पार पडली शस्रक्रियेनंतर आई आणि मुलीच्या प्रेमाला एक नवा आयाम मिळण्यासोबत जवळच्या नात्यात रक्तगट विसंगत असूनही ” मूत्रपिंड प्रत्यारोपण ” करणे आता शक्य असल्याने गरजू रुग्णांना आशेचा एक नवा किरण दिसला आहे . विसंगत रक्तगटातील शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याबद्दल अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल चे मेडिकल डायरेक्टर सुशील पारख यांनी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर व शस्रक्रिया करणाऱ्या टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेहि शस्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मूत्रपिंड रोग व उपचार विभागाचे डॉ नागेश अघोर ,मूत्रपिंड शल्य चिकीत्सक डॉ राधेश्याम चौधरी , भूलतज्ज्ञ डॉ केतन ठोबरे व डॉ हितेंद्र महाजन इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरचा प्रमुख समावेश होता
—————————

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर म्हणाले ” मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये असलेल्या अनुभवी, निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धते मुळे आणि मेहनतीमुळे किडनी प्रत्यारोपण सारख्या मोठया आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडतात तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णाची स्वछता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते, रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची हि काळजी घेतली जाते . किडनी प्रत्यारोपण करण्याकरिता बऱ्याच रुग्णांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असते अशा रुग्णांना काही स्वयंसेवी संस्था तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत आर्थिक देणगी मिळावी यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे प्रयत्न केले जातात , किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते परंतु आता हि सुविधा नाशिक मधेच असल्याने आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होणार आहे .अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स नाशिकमध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत असतो.

– श्री समीर तुळजापूरकर (केंद्र प्रमुख , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News