आता दुर्बिणीद्वारे दुखणा-या मनगटावरील शस्रक्रिया नाशिक मध्ये शक्य

Jul 10, 2019

सोपान हॉस्पिटल डॉ अमित वराडे यांचे यश

नाशिक – हाताच्या विविध आजार व व्याधींवर परिपूर्ण उपचार करणा-या भारतातील निवडक शहरामध्ये मध्ये आता नाशिकचाही समावेश झाला असून येथील सोपान हॉस्पिटल येथे प्रख्यात हॅन्ड सर्जन डॉ अमित वराडे हे त्यांच्या  हॅन्ड सर्जरी सेंटर मार्फत त्या सेवा देत आहेत.
 थोड्या वेगळ्या पण अत्यंत गरजेच्या अशा या स्पेशालिटी मध्ये अपघातामध्ये लुळा पडलेल्या हातासाठी शस्रक्रिया, पूर्णपणे तुटलेला हात व बोटे जोडणा-या शस्रक्रिया, हाताच्या जन्मजात व्यंगावर उपचार व शस्रक्रिया अशा विविध प्रकारच्या शस्रक्रिया होत असून नुकतेच मनगटाचे दुखणे असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकेल अशी दुर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देतांना डॉ अमित वराडे म्हणाले की, मनगटाचे दुखणे हे प्रामुख्याने मनगटाच्या आतील लिगामेंट / कुर्चा तुटल्यामुळे असते. अशा प्रकारच्या रुग्णांना यापूर्वी मनगट उघडून शस्रक्रिया करावी लागत असे. ज्यामुळे मनगटावर मोठा व्रण दिसत असे आणि मनगटाच्या हालचाली शस्रक्रीयेनंतर कमी होत असत. परंतु आता  मनगटाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली तर मनगटाचे दुखणे पूर्णपणे जाते तसेच मनगटावर व्रण होत नाही आणि मनगटाच्या हालचाली पूर्ववत होतात.
  दुर्बिणीद्वारे मनगटाचे लिगामेंट / कुर्चा जोडणे हि डे केअर प्रकारची शस्रक्रिया आहे .म्हणजे रुग्णाला शस्रक्रियेनंतर त्याच दिवशी घरी पाठवता येते. मनगटाचे दुर्बिणीद्वारा उपचार हि एक आधुनिक पद्धतीची उपचार पद्धती आहे. अशा प्रकारची शस्रक्रिया हि भारतातील काही निवडक ठिकाणीच केली जाते. या शस्रक्रीयेसाठी २.७ मि.मी. इतका बारीक ऑर्थोस्कोप वापरण्यात येतो. असेही त्यांनी नमूद केले . डॉ अमित वराडे यांनी या आधीही हाताच्या अनेक शस्त्रक्रिया साफाल्रीत्या पार पडल्या असून त्यामुळे अनेकांना नवजीवन मिळाले आहे .

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News