नाशिक : गोदा श्रध्दा फाउंडेशन ही नाशिक मधील समाजकार्याला वाहून घेतलेली अग्रणी संस्था गेल्या चौदा वर्षांपासून प्रत्येकवर्षी आपली दिनदर्शिका प्रसिध्द करत असते व या दिनदर्शिकचे वैशिष्टये म्हणजे नाशिक जिल्हयातील छायाचित्रकारांना आपल्या वैविध्यपूर्ण विषयांचे छायाचित्र आपल्या दिनदर्शिकेवर सादर करण्याची संधी गोदा श्रध्दा फाउंडेशन देत असते हीच संधी २०२२ च्या या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे. गोदा श्रध्दा फाउंडेशनचे नुकतीच आपली दिनदर्शिका प्रसिध्द व वाटप सोहळा भाजपा संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, सुजाता करंजकीकर, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, मध्य मंडळ अध्यक्ष देवदत्त जोशी, नगरसेवक ॲड शाम बडोरे, भगवान दोंदे, आशिष नहार, सुरेश अण्णा पाटील, अरुण शेदुर्णीकर, दिपक शेवाळे, राम बडोदे,शिवम शिंपी, देवेंद्र चुंभळे, विजय कुलकर्णी आदि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






