नाशिक : सोशल मिडियावर टायगर श्रॉफ नेहमीच नवीन काही करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो.नव्या पिढीला भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे टायगर श्रॉफ. टायगरने मेहनतीने कमावलेली शरीरयष्टी, त्याचे फायटिंग आणि डान्सिंग स्किल्स यामुळे तो कमालीचा लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही टायगर नेहमीच सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट काही मिनिटातच व्हायरल होतात.
आज टायगरने ‘कू’ वर टायगर श्रॉफने नुकताच पोस्ट केलेला एक नवाकोरा व्हीडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. कारण हा व्हीडिओ आहे आईस्क्रीम डायटविषयीचा. हे आगळेवेगळे डायट तुम्हाला माहित आहे का असा प्रश्न पोस्ट करताना टायगरने विचारला आहे.
24 सेकंदांच्या या व्हीडिओत टायगर जीम करता करता आईस्क्रीमचा आनंद घेतो आहे.पहा खालील फोटो लिंकवर
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...







