मैकेनिकल थरोमबेक्टोमी या अत्याधुनिक उपचार प्रणालीने तीव्र पक्षाघाताच्या पेशंटला जीवनदान

Jul 13, 2019

नाशिक  : मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीमध्ये गुठळी झाल्याने पक्षाघाताचा गंभीर आजार झालेल्या 65 वर्षीय रुग्णाला डॉ. श्रीपाल शहा यांच्या अनुभवी कौशल्यपूर्ण उपचाराने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जीवनदान मिळाले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, सातपूर येथील 65 वर्षीय श्यामलाल महाजन यांना तिवर पक्षाघाताचा झटका आल्याने ( ब्रेन स्ट्रोक) डॉ. श्रीपाल शहा यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात  आले.  परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर होती. डॉ. शहा यांनी त्यांना तत्काळ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सांगितले.  पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी स्ट्रोक आलेल्या क्षणापासून पहिेले साडेचार तास अत्यंत महत्वपूर्ण असतात.  अशोकामध्ये दाखल केल्यानंतर निदान होत असतानाच सदर रुग्ण काही मिनिटातच  कोमात गेला. त्यांना त्वरित व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णावर त्वरित एमआरआय करण्यात आले. त्यांच्या मागच्या मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या मोठ्या रक्तवाहिनी(बेझिलर आर्टरी)धमणीत मोठ्या गुठळ्या(क्लॉटस्) आढळल्या. रुग्णांच्या छोट्या मेंदूतील अंतरंगात भागात असलेली धमणी रिपोर्टमध्ये अदृश्य झाली होती. एकीकडे रुग्णाचा मेंदू झपाट्याने मृत होत असल्याने ते कोमात गेले तर दुसरीकडे त्यांना कृत्रिम श्वासोश्वासावर (व्हेटींलेटर) ठेवण्यात आल्याने रुग्ण अत्यावस्थ झाला होता.  सर्व निदान आणि चाचण्या करुन डॉ. शहा यांनी गंभीर रुग्णाला तत्काळ ऍन्जिंओग्राफी करण्याचा निणर्र्य घेऊन मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीतील गुठळी  (मेकॅनिकल थ्रॉबॅक्टोमि) द्वारे काढून रुग्णाचा धोका तत्काळ कमी केला. काही तासांतच रुग्ण व्हेन्टींलेटर वरुन बाहेर निघाला व नॉर्मल झाला.
रक्तवाहिन्यातील गुठळ्या काढून पक्षाघातावर जरी तात्पुरता विजय मिळवला असला तरी लहान मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील 85 ते 90 टक्के आकुंचित झाल्या होत्या. त्यांना मोेकळे करणे गरजेचे होते. डॉ. शहा यांनी रुग्णातील धोके (रिस्क फॅक्टर) ओळखून इलाज सुरू ठेवले. दोन आठवड्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा करण्यास धमण्यामधील आकुंचितपणा दूर करण्यासाठी इण्टरा क्रेनीयल सटेंटिंग शस्त्रक्रिया करण्यात आली, हि अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. डॉ. शहा यांचे तज्ज्ञ, अनुभव, कौशल्य आणि त्याला अशोका हॉस्पिटल मध्ये मिळणारी अत्याधुनिक-अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड यामुळे मेंदूची अतर्ंगत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले.  आज श्यामलाल महाजन निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे. 
स्टेन्ट द्वारा रक्तवाहिनीतील क्लॅट किंवा गाठ काढणे. काही रूग्णांमध्ये ज्यांना मोठ्या रक्तवाहिनीत क्लॉट झाल्यामुळे मोठा पक्षाघात होतो त्यांना क्लॉट रिट्रीवर थेरपीचा उपयोग होऊ शकतो.
क्लॉट रिट्रीवर स्टेंटच्या माध्यमातून काढू शकतो. 6 तासाच्या आत, तर काही पेशंट मध्ये 24 तास पर्यंत या पध्दतीने क्लॉट काढू शकता. या उपचारामध्ये मांडीच्या रक्तवाहिनीद्वारे मेंदुतील बंद असलेल्या मोठ्या रक्तवाहिनीपर्यंत पोहचून स्टेंटद्वारे रक्ताची गुठळी काढण्यात येते. जी उपचार पध्दतीच्या तुलनेत मेंदूच्या मोठ्या रक्तवाहिनी उघडण्यात अधिक प्रभावशाली आहे. ही उपचार पध्दती मोठ्या पक्षाघातासाठी फायदेशीर आहे व जगभरात या पध्दतीने क्रांती केली आहे.
या पत्रकार परिषदेस अशोका मेडीकव्हर हॉस्पीटलचे मेंदुविकारतज्ञ डॉ. तेजस साकले, मेडीकल डायरेक्टर डॉ. सुशिल पारख, सेंटर हेड सचिन बोरसे, रिजनल हेड अभिनंदन दस्तनवार उपस्थित होते.

पक्षाघाताची लक्षणे :  
* चेहरा हातपाय सुन्न पडणे, किंवा निष्क्रिय होणे.
* अचानक बोबडी वळणे,वाचा जाणे, इतरांचे म्हणने न समजणे.
* अचानक गरगरणे, चक्कर येऊन तोल जाणे, गिळण्यास त्रास, डोळ्यासमोर अंधार येणे किंवा अंधुक दिसणे, दृष्टी जाणे, अचानक काही क्षणांसाठी स्मृती जाणे अशी लक्षणे आढळल्यास रुग्णाला मेंदूरोगतज्ञ असलेल्या रुग्णालयात तत्काळ दाखल करुन सीटीस्कॅन, एम. आर. आय. करावे.     –  डॉ. श्रीपाल शहा, मेंदूविकार तज्ज्ञ.

  ब्रेन स्ट्रोकचीं प्रमुख कारणे
अनियंत्रित अतिउच्च रक्तदाब, तंबाखु सेवन, धुम्रपान ,अतीलठ्ठपणा, अनियंत्रित मधुमेह, ब्रेन स्ट्रोकची अनुवंशीकता, ह्रदयविकार किंवा नाडी जास्त वाढणे, अतिप्रमाणात रक्त गोठण्याची प्रवृत्ती असणे, बी-12 जीवनसत्वाची कमरतात, होमोसिस्टीन घटकद्रव्य अधिक प्रमाणात असणे या कारणांनी पक्षाघात संभवातो.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News