अशोका मेडिकव्हर हाॅस्पिटल मध्ये ” नोव्हो टेक्निक” द्वारे सांधेरोपण शस्त्रक्रिया – डॉ जयेश सोनजे ( सांधे रोपण शस्त्रक्रिया तज्ञ)

Feb 14, 2022

आरोग्य संवाद : “नोव्हो टेक्निक” हि भारत सरकार मान्यता प्राप्त आधुनिक तंत्रज्ञान डॉ जयेश सोनजे यांनी विकसित केले आहे.आणि या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रकिरयेनंतर रूग्णाला सांधेरोपण शस्त्रक्रिया करणे सहज आणि सोपी झाली आहे

प्रतिनिधी | नाशिक
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत चाललेली स्पर्धा. जास्त काम करण्याचा अट्टाहास आणि व्हिटॅमिन डी च्या अभावा मुळे पाठदुखीचा आणि गुडघेदुखीचा त्रास आता वयाच्या चाळिशीतही दिसायला लागला आहे.चांगले आरोग्य सांभाळलेल्या आणि उत्साही आजी-आजोबांना जीवनात एकदा तरी चारधाम यात्रा किंवा युरोप टूर करण्याची आवड निर्माण झालेली असते, परंतु सर्वात मोठं संकट येतात ते गुडघेदुखीच..!

का होते ही गुडघेदुखी ?
तर गुडघ्यातील कुर्चा (गादी) पूर्णपणे झिजली की सुरू होते गुडघेदुखी आणि मग सुरू होतात वेगवेगळ्या डॉक्टरांकडे फेऱ्या, हजारो प्रकारच्या वेदनाशामक गोळ्या , तेल मालिश, शेजारी, नातेवाईकांनी दिलेले विविध सल्ले त्यात कुठल्याच गोष्टीचा चांगला गुण येत नाही म्हणून आलेलं नैराश्य या चक्रात अडकलेल्या आजी-आजोबांना काय करावं हे सुचत नाही.गुडघेदुखी मुळे जास्त वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या तर मुत्रपिंड ( किडनी) निकामी होण्याची शक्यता जास्त असते. शस्त्रक्रिये बद्दल असणारे गैरसमज आणि भिती हि आजच्या घडीला वास्तुस्थितीला धरून नाही.
सांधे रोपण शस्त्रक्रिया बद्दल भीती वाटणे साहजिक आहे. गुडघे प्रत्यारोपण बद्दल थोडी जास्तच भीती आणि गैरसमज ही पसरलेले आहेत आणि याच कारणांमुळे जेष्ठ नागरिक डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर ही शस्त्रक्रिया करून घेण्याचे टाळतात. या मुळे भविष्यात गुडघेदुखी गंभीर स्वरूप धारण करते. या लेखाद्वारे डॉ जयेश सोनजे या सांधेरोपण शस्त्रक्रिये विषयीची माहिती सोप्या शब्दात आपल्याला सांगणार आहेत.

सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बद्दल समज-गैरसमज
१. गैरसमज : सांधेरोपण शस्त्रक्रिया सहसा यशस्वी होत नाही.
सत्य : शस्त्रक्रिया अनुभवी आणि तज्ञ सर्जन कडून करून घेतल्यास नक्की यशस्वी होते.
२. गैरसमज : सांधे प्रत्यारोपण केल्यानंतर गुडघेदुखी अजून वाढते.
सत्य : यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुडघेदुखी पूर्णपणे नाहीशी करते.
३. गैरसमज : शस्त्रक्रियेनंतर खूप व्यायाम करावा लागतो.
सत्य : गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली असेल तर जास्त व्यायामाची गरज पडत नाही.
४. गैरसमज: गुडघे प्रत्यारोपण केल्यानंतर जास्त चालता फिरता येत नाही.
सत्य: गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर चालायला किंवा फिरायला कुठली ही मर्यादा नसते.
५. गैरसमज:- गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एका विशिष्ट वयातच करावी.
सत्य: गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही गुडघ्यात असलेल्या कुर्च्या पूर्ण झिजली की करावी.
६. गैरसमज :- प्रत्यारोपण केल्यानंतर मांडी घालून बसता येत नाही.
सत्य : आधुनिक शस्त्रक्रिया ची पद्धत आणि आधुनिक सांधे वापरल्यास सहज मांडी घालून बसता येते.
७. गैरसमज:- मधुमेह उच्च रक्तदाब किंवा लठ्ठ व्यक्तींनी ही शस्त्रक्रिया करू नये.
सत्य : भौतिक उपचारानंतर सदर रुग्णावर शस्त्रक्रिया सहज सोपी आहे.

नोव्हो टेक्निक म्हणजे काय ?
डॉ जयेश सोनजे यांनी मागील आठ वर्षात ४००० हून अधिक यशस्वी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. जगभरात वेगवेगळ्या देशात जाऊन या शस्त्रक्रियेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेतले आहे .डॉ जयेश सोनजे यांनी अभ्यासाअंती सांधे प्रत्यारोपणाचे आधुनिक प्रगत तंत्रज्ञान विकसित केले ज्याला “नोव्हो टेक्निक” असे नाव देण्यात आले आहे.
“नोव्हो टेक्निक” हि एक आधुनिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र आहे ज्या द्वारे त्वचेवरचा चीरा छोटा असतो. आतील स्नायूला इजा पोहोचत नाही. रक्तस्राव नगण्य असतो. वेदना बिलकुल होत नाही . औषधांचा वापर फार थोडा असतो. रूग्णाला दीर्घकाळ व्यायामाची गरज पडत नाही. हॉस्पिटल मधून तीन दिवसात रूग्णाला डिस्चार्ज मिळतो आणि पेशंट कुठल्याही आधाराशिवाय पहिल्या दिवसापासून चालायला लागतो.
मागील काळात म्हणजेच दहा पंधरा वर्षांपूर्वी या शस्त्रक्रियेचे परिणाम फारसे चांगले मिळत नव्हते. त्यामुळे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिये विषयीं प्रचंड प्रमाणात समज – गैरसमज लोकांमध्ये पसरलेले होते. पण आता आधुनिक

तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया एकदम सहज सुलभ सोपी झाली आहे. म्हणूनच गुडघेदुखीचा त्रास होत असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार केले तर आपल्या दैनंदिन जीवनात आणि सुखदायी आयुष्यात गुडघेदुखी मुळे व्यत्यय येणार नाहीत .
“नोव्हो टेक्निक” द्वारे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च पण खूप कमी झाला आहे. तेव्हा ही शस्त्रक्रिया आता कमी खर्चात होत आहे. आजपर्यंत बऱ्याच सामाजिक संस्थांनी डॉ जयेश सोनजे यांचा नाशिक भुमी पुत्र म्हणून सन्मान केला आहे. माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान म्हणजे माझ्या रूग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हाच योग्य सन्मान सांधे रोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ जयेश सोनजे मानतात.

“नोव्हो टेक्निक” या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अवघ्या २५ ते ३० मिनिटांत होते.रुग्णाला फिजिओथेरपी ची आवश्यकता भासत नाही. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांला दैनंदिन जीवनातील कामे सहजरित्या करता येतात.
——————
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये असलेल्या अनुभवी, निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धते मुळे आणि मेहनतीमुळे सांधे प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडतात. तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णाची स्वछता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते, रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही. याची हि काळजी घेतली जाते . सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते. परंतु आता हि सुविधा नाशिक मध्येच असल्याने आता कुठेही जाण्याची गरज नाही. रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होत आहे .अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स नाशिकमध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत असतो.

– श्री समीर तुळजापूरकर – केंद्र प्रमुख ,
– अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक.

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय...

read more
अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

नाशिक : किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिकने प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा...

read more
Breaking News