अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचले रुग्णाचे प्राण… !!! – डॉ.सुशील पारख

Feb 20, 2022

आरोग्य स्पंदन : आरोग्य स्पंदन : अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक कॅथलॅब द्वारे आता IVAS,ROTABLATOR, FFR ,IBP, OCT सुनिश्चित पद्धतीने वैद्यकीय विश्लेषण अधिक अचूक व गतिमान होणार असून नवजात शिशूं ते जेष्ठा पर्यन्त हृदयोपचारासाठी या कॅथलॅबमध्ये विशेष सुविधा उपलब्ध केली आहे.कार्डियोलॉजी विभागामध्‍ये चोवीस तास हार्ट स्‍पेशालिस्‍ट आणि अॅनेस्थिसियोलॉजिस्ट्स कार्यरत असतील. तज्ज्ञ इंटरवेन्‍शनल कार्डियोलिस्‍ट्स आणि सर्जन्‍सची टीम कॅथलॅब मध्ये उपचारासाठी उपलब्ध असतील.

नाशिक : बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकारामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलकडून वाढत असलेल्‍या हृदयविकारांनी पीडित रूग्‍णांच्‍या गरजांची पूर्तता करता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक तंत्रज्ञान असेलल्या कॅथलॅब मध्ये आता अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, स्टेंटिग, व्हॉल्व्होटॉमीज (हृदयाच्या झडपांचे उपचार) व पेसमेकर असे उपचार रास्त दरात उपलब्ध होतील. ही यंत्रणा संपूर्णपणे संगणकावर चालणारी असून हृदयातील अंतर्गत भागातील रक्तवाहिन्यांच्या प्रतिमा सुस्पष्टपणे दिसणार असल्यामुळे डॉक्टरांना उपचार करण्यातही मोठी मदत होणार आहे. या मध्ये रक्तवाहिनीचे व धमण्यांचे सुष्म निरिक्षण कुशल पद्धतीने करतात. तसेच निदान ,उपचार आणि ॲन्जोग्राफी सुद्धा करता येते.कॅथलॅब मध्ये क्ष-किरणाचा कमीत कमी वापर केला जातो जेणेकरून रुग्ण , डॉक्टर व कर्मचारी यांना क्ष-किरणाचा कमीतकमी सामना करावा लागतो इतर ठिकाणी याचा विचार केला जातोच असं नाही. वयानुरूप हाडांची क्षमता ही दिवसागणिक कमकुवत झालेले असते. अशा वेळी क्ष-किरण शरिरासाठी योग्य नसतात. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मधील अत्याधुनिक कॅथलॅब मध्ये Angiography , Angioplasty व्यतिरिक्त IVAS,ROTABLATOR, FFR ,IBP, OCT या सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ॲन्जोप्लास्टी केली जाते. ज्याचे दीर्घकालीन परिणाम रुग्णांसाठी एक वरदान आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयविकार व मेंदुविकार यासंबंधीची गुंतागुंतीचे निदान व शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात येत आहे.हृदयविकार सोबतच इतर उपचारासाठी रुग्णांना आता पुणे मुंबई सारख्या महानगरात जाण्याची आवश्यकता राहिली नाही. यामुळे आर्थिक भार कमी झाला आहे.

ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी (OCT) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने निदान व उपचार

रुग्णांसाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वरदान आहे. हृदयाला व मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील रक्ताच्या गाठीचे किंवा अडथळ्याचे प्रकाशाच्या सहाय्याने कार्डियाक कॅथेटेरायझेशन दरम्यान मूल्यमापन करून निदान व उपचार केले जातात. OCT चाचणी नंतर रक्तवाहिन्यांची लांबी रुंदी कळते .यामुळे रुग्णाला भविष्यात होणाऱ्या रक्तवाहिनीतील अडथळा निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे. हृदयविकाराने ग्रस्त व्यक्तींवर परिणामकारक उपचार या तंत्रज्ञानाच्या साह्याने करणे आता सहज सोपे आहे. हृदयरोग विकारांसोबत रुग्णांना इतर आजार सुद्धा आहेत उदा. मेंदू विकार, दम्याचे विकार, किडनीचे विकार, हाडांचे आजार किंवा वयोवृद्ध व्यक्ती अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अनॅस्थेशिया चा त्रास होऊ शकतो अशा रुग्णांना ऑप्टिकल कोहेरेन्स टेमोग्राफी ( OCT) यांच्या सहाय्याने ॲन्जोप्लास्टी एक वरदानच आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका वय वर्ष ४७ व्यक्तीवर OCT ( Optical Coherence Tomography ) या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या ॲन्जोप्लास्टी करण्यात आली

या स्वरूपाच्या शस्त्रक्रिया पूर्वी मुंबई पुणे यासारख्या महानगरातच होत होत्या आणि खर्चिक सुध्दा होत्या . आता त्या अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल नाशिकमध्ये सहज शक्य झाल्या आहेत या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ॲन्जोप्लास्टी ही फार सुरक्षित व परिणामकारक झाली आहे हृदयरोग तज्ञ ज्यांनी यात विशेष प्रावीण्य मिळवले आहेत‌. अशा तज्ञांकडून ह्या प्रक्रियांची धोक्याची पातळी अर्ध्या टक्क्यांपेक्षाही कमी असते आणि सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या हॉस्पिटलमध्ये ही धोक्याची पातळी शून्य टक्के असते, असे म्हणायला हरकत नाही.महत्वाचे म्हणजे योग्य रुग्णाची निवड ,योग्य साहित्याचे निवड, चांगल्या हॉस्पिटलची निवड आणि निशांत डॉक्टर याचा संगम म्हणजे यशस्वी ॲन्जोप्लास्टी.

वय वर्ष 58 व्यक्तीवर CRT-D ची हृदयरोगावरील शस्त्रक्रिया यशस्वी

हृदयरोगावरील सीआरटी -डी हि शस्त्रक्रिया रुग्णालयात यशस्वीरित्या पार पाडण्यात आली CRT-D हे एक विशेष उपकरण आहे. आणि ते सामान्य पेसमेकर पेक्षा थोडसं वेगळं आहे. यात अंगभूत इम्प्लांट करण्यायोग्य कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर (ICD) देखील समाविष्ट आहे. या प्रकाराला कार्डियाक रिसिंक्रोनायझेशन थेरपी डिफिब्रिलेटर (CRT-D) असं म्हणतात. ज्यां रूग्णाला अचानक हृदयविकाराचा झटका उद्भवण्याची शक्यता असते. अशा रुग्णांमध्ये हे पेसमेकर बसवण्यात येते मंद हृदयाच्या लयांवर उपचार करण्यासाठी सामान्य पेसमेकर पेक्षा वेगळे कार्य करत असताना सीआरटी – डी उपकरण हृदयाच्या डाव्या आणि उजव्या कप्प्यामध्ये एकाच वेळी आकुंचन होण्यास मदत करण्यासाठी लहान विद्युत वेग ( Electric Path Way) देखील वितरीत करते हे तुमचे हृदय अधिक कार्यक्षमतेने सुरू राहण्यास मदत करतं आणि हृदयाचं कार्य व्यवस्थित सुरू राहील याचीसुद्धा काळजी घेतं.

मेंदू विकाराने ग्रस्त ३१ वर्ष व्यक्तीला (EE) या आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मिळाले जीवनदान
इंडोवैस्कुलर कॉइल एम्बोलिझेशन (Endovascular Coil Embolization) हि एक शस्त्रक्रिया आहे जी आपल्या मेंदूत किंवा आपल्या शरीराच्या इतर भागामध्ये असामान्य रक्तवाहिन्यांचा उपचार करण्यासाठी वापरली जाते. हे प्रभावित भागात रक्त प्रवाह बंद करते. या मध्ये कवटीला छेद देऊन शस्त्रक्रिया करण्याची गरज पडत नाही पायाच्या धमिनी मध्ये एक मायक्रोकॅथेटर टाकून मेंदूमधील रक्तस्राव थांबविण्यात येतो.
या रुग्णाला सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत होता रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर मेंदू विकार तज्ञांकडून तपासणी व DSA चाचणीतून असे निर्दशनास आले की रुग्णाच्या मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची गाठ तयार झालेली आहे. यालाच धमणीविकार (Aneurysm) म्हणजेच रक्तवाहिनीची होणारी अवाजवी वाढ असं हि संबोधतात. याच बरोबरीने रुग्णाला मेंदूमध्ये काही ठिकाणी रक्तस्राव हि होत होता. यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त होती. यामुळे या रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेची होते. या तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात तज्ञ डॉक्टरांचा समावेश होतो

डॉ गौरव वर्मा
(Cardiac Resynchronization Therapy Defibrillator (CRT-D) )

डॉ अतुल पाटील (Complex Angioplasty with OCT Optical coherence tomography)

डॉ नौष पाटील
(Complex Brain Aneurysm Coiling and AVM embolization)
या सोबतच कॅथलॅब मध्ये कर्मचारी
अमृत शिंदे , विशाल गायकवाड, सुधिर पडघन ,जेनुवा कारूक्याली
ज्ञानेश्वर वरपे ,गोरख पावरा ,किरण काटाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

जलद आणि अचूक निदान याच्या जोरावर आपण अतिशय क्लिष्ट आजारांवर देखील निसंकोच परिणामकारक उपचार करू शकतो आणि त्यामुळेच ज्या आजारांच्या निदानासाठी पूर्वी मुंबई किंवा पुण्यामध्ये जावे लागत होते ते निदान आता अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये करू शकतो आणि त्याचा लाभ पेशंटला तात्काळ आणि कमी खर्चिक होत असल्यामुळे सर्वसामान्यांना आधुनिक उपचार पद्धती चा लाभ मिळू शकतो.

–समीर तुळजापूरकर ,केंद्र प्रमुख, अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल नाशिक

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News