सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण जाहीर

Feb 23, 2022

अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश 

नाशिक  :- शनिवार दि. ०५ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश आहे. 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात येतात. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली.

 यामध्ये चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  तर कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पुजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हेमंत राठी यांना “जीवन गौरव” पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ.अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं..कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व जेष्ठ साहित्यिक प्रा.विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे.       

या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संयोजक आकाश पगार मोबा. ९४२१५६३५५५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सुविचार मंचच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आले आहे. दि. ०२ जानेवारी २०२२ रोजी सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार होता. परंतु त्यावेळेस वाढलेली कोविड रुग्णांची संख्या व सरकारच्या वतीने लावण्यात आलेले निर्बंध यांमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News