दु:खण्याला कंटाळून जीव देण्यास निघालेल्या गृहिणीला स्वामींनी वाचविले !

Feb 24, 2022

वाचा आजच्या स्वामीलीलात

|| स्वामी लीला ||
मोरोबा कुलकर्णी म्हणून एक गृहस्थ अक्कलकोट मध्ये रहात होती.. स्वामी महाराज कधी कधी त्यांच्या घरी जात असे.. असेच एके दिवशी स्वामी महाराज मोरोबांच्या घरी मुक्कामाला होते.. रात्र झाली.. मोरोबा सह सोबत असलेली सेवेकरी मंडळी झोपी गेली.. मोरोबांच्या पत्नीस पोट दुखीचा त्रास होता.. पोटात येणाऱ्या कळा तिला असह्य होत होत्या.. आणि त्याच रात्री त्यांस त्रास झाला.. त्रास इतका वाढला कि मोरोबांच्या पत्नीला असे वाटले कि आता जीव द्यावा आणि त्याच प्रमाणे त्यांनी केले.. मध्यरात्रीच्या वेळी.. सर्व लोक झोपलेले असतांना त्या धावत जावुन बाहेर असलेल्या विहिरीवर जीव देण्यासाठी गेल्या.. आणि विहिरीच्या काठावर उभ्या राहिल्या.. स्वामी भक्त हो !! जो जागृती आणि निद्रेच्या पलीकडील शाश्वत परमजागृतीची अवस्था आहे.. अशा स्वामी महाराजांनी तेथील सेवेक-यांना आवाज दिला आणि बोलेले “ अरे.. विहिरीत कोणीतरी जीव देतो आहे.. पहा बरे !! ” इतक्यात एक सेवेकरी बोलला “स्वामी इतक्या रात्री कोण आपला जीव देईल.. आपण स्वस्थ निजावे !! ” सेवेक-याने असे बोलताच स्वामी चिडले आणि पुन्हा बोलले “ अरे तुम्ही अरण्यपंडित आहात.. आम्ही खरे सांगितलेले असून.. तुम्ही आमचे ऐकत नाही.. मुर्खानो !! ” आता मात्र सेवेकरी लगबगीने उठले आणि विहिरीवर जावून बघतो तर मोरोबांची पत्नी उडीच टाकणार होती.. इतक्यात सेवेक-यांनी तिचा हात पकडला.. आणि समर्थांच्या समोर आणून उभे केले.. त्या नंतर मोरोबासह इतर मंडळी तेथे आली.. मोरोबांनी आपल्या पत्नीला ओळखले आणि त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घालून कळकळीची प्रार्थना केली..” महाराज आज माझ्यावरील संकटाचे निवारण केले… आपल्याला धन्यवाद.. हे स्वामी आई !! असाच आम्हा दासाचा सांभाळ करा हि विनंती !! ” स्वामी भक्त हो !! मोरोबांनी अशी प्रार्थना करताच.. स्वामींनी त्यांच्या पत्नीकडे कृपादृष्टीने बघितले.. आणि आश्चर्य घडले.. मोरोबांच्या पत्नीच्या पोटात दुखण्याचे थांबले.. त्यांना आराम वाटू लागला.. स्वामींची हि लीला बघुन सर्वांच्या हृदयात अनन्य भक्तीचा भाव जागृत झाला आणि सर्वांनी एकघोषात स्वामींचा जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||

आजच्या स्वामी लीलेतून स्वामी पुन्हा खूप छान बोध देत आहेत.. आजच्या स्वामी लीलेतून स्वामी आपणास आपल्यातील ‘आळशी’ वा ‘कामाची टाळाटाळ’ वा ‘सतत कारणे ’ सांगणाऱ्या मनाच्या वृत्तीचे दर्शन घडवत आहेत.. इतकेच नव्हे तर त्या मनाला आपण वेळीच ताब्यात ठेवले नाही.. जीवनात नकारात्मक परिणाम येवू शकतात ह्याचे सुद्धा शिकवण देत आहेत.. बघा !! आजच्या लीलेत स्वामींनी ज्या सेवेक-यांना हुकुम दिला परंतु त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला.. आणि त्या नंतर स्वामींनी जर त्यांना दरडावून सांगितले नसते तर कदाचित मोरोबांच्या पत्नीचा प्राण गेला असता.. थोडक्यात आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून बोध घेता.. आपल्याला आपल्यातील टाळाटाळ करणाऱ्या मनावर अंकुश ठेवायचा आहे.. बघा !! जसे त्या सेवेक-यांनी स्वामींना कारण सांगितले.. अगदी तसेच एखाद्या घटनेमध्ये हे आपल्यामधील मन सुद्धा पंडित बनून आपणास सबब – कारण सांगून काम टाळण्याचा प्रयत्न करत असते.. उदा. समजा आपले आरोग्य उत्तम राहावे म्हणून.. स्वामीं आपणास व्यायाम करण्याचे संकेत देतात.. परंतु तेव्हा आपले मन कारण सांगते.. ‘मी व्यायाम केला असता.. पण मला सकाळपासून खूप कामं असतात.. अमुक करायचे तमुक करायचे वगैरे ’ किवां जेव्हा आपणास पैशाची कमतरता असते तेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा स्वामी महाराज आपल्या जीवनात विविध यशस्वी व्यक्तिमत्व लिखाण – वाचन वा प्रत्यक्षात पाठवुन आपणास प्रेरणा देवून कर्म करण्याचे संकेत देत असतात… जर ह्या लोकांना शक्य आहे.. तर तुला सुद्धा शक्य आहे अशी प्रेरणा देत असतात.. परंतु त्यातून प्रेरणा घेण्या ऐवजी.. आपले मन कारण देत बोलत असते कि ‘ त्यांच्याकडे पैसा होता म्हणून ते यशस्वी झाले वा त्यांचे कुटुंब त्यांना साथ देत होते.. वा ते नशीबवान होते.. किंवा त्यांचे पूर्वपुण्य छान आहे.. मी पातकी आहे.. वगैरे वगैरे ’ स्वामी भक्त हो !! आपणास ह्या ‘ कारणे सांगणाऱ्या ’ वा ‘ टाळाटाळ ’ करणाऱ्या मनावर दृढ अनन्य भक्तीच्या शक्तीने विजय मिळवायचा आहे.. आपली इच्छाशक्ती प्रबळ करून.. आपले कर्म हीच स्वामी भक्ती.. हीच स्वामी सेवा.. ह्या दृढ निश्चयाने वर्तमानातील प्रत्येक कर्म उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.. जसे ‘चांगले आरोग्य ठेवणे’ हा स्वामी हुकुम आहे.. ‘यशस्वी जीवन जगून समाजात प्रेम – आनंद – समृद्धी – शांती – नम्रता – कृतज्ञता – साहस अशा स्वामी गुणांची अभिव्यक्ती करणे’ हा स्वामी हुकुम आहे.. असा दृढ अनन्य भक्ती भाव मनात ठेवून कर्म केले तर आपण आपल्या ह्या मनावर निश्चितच विजय मिळवू शकतो.. आणि स्वामींना अपेक्षित यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करू शकतो.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे गुरुराया !! आम्हाला तुझे वेड लावले तुला धन्यवाद !! तुझ्या अनन्य दृढ भक्तीचा खजाना दिलास तुला धन्यवाद !! चंचल मनावर ताबा मिळवण्यास दृढ इच्छाशक्तीचे वरदान दिले तुला धन्यवाद !! तुझी हि कृपा अशीच बरसत राहो हीच तुझ्याचरणी प्रार्थना !! स्वामी धन्यवाद !! अनंत कोटी धन्यवाद स्वामी !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News