सुशील आय केअरचा समावेश डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलमध्ये

Feb 26, 2022

रुग्णांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता येणे आता झाले सोपे!

नाशिक : नाशिक शहरातील आयटीआय सिग्नल,सातपुर रोडवरील स्थित सुशिल आय केअरचे डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पीटल मध्ये विलनीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ.अमर अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सुशिल आय केअरचे वैदयकीय संचालक डॉ.शरद पाटील, डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पीटच्या विस्तारप्रमुख डॉ.वंदना जैन, संचालक,आय रिसर्च सेंटरच्या डॉ.अथिया अग्रवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ.अग्रवाल्स ग्रुप चे अध्यक्ष डॉ.अमर अग्रवाल म्हणाले कि, “सुशिल आय केअर हे ३५ वर्षांहून अधिक कालावधीपासून नेत्रविकाराच्या क्षेत्रात आपले योगदान देत आहेत आता सुशिल आय केअर हा डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पीटलचा भाग असल्याने Glued Iol, Cairs, Sft & Pdek या जागतिक स्तरावरील दर्जेदार असे तंत्रज्ञान व सर्जिकल इनोव्हेशन्स नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. टाळता येण्यासारखे अंधत्व आमच्या उपक्रमाचा मूळ उदेदश आहे.यासाठीच्या विस्तारीकरणासाठी आम्ही १ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.२०० आय केअर सेंटर व ५०० आउटरिच क्लिनीकच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहविण्याचा आमचा मानस आहे. ”
याबाबत अधिक माहिती देत ते पुढे म्हणाले कि,सुशिल आय हॉस्पिटल बरोबर आणखी नाशिकच्या कॉलेज रोड व नाशिकरोड हया ठिकाणी आम्ही डॉ.अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटची भागीदारी करुन हॉस्पिटल सुरु करणार आहे.

सुशिल आय हॉस्पीटलचे वैदकिय संचालक डॉ.शरद पाटील म्हणाले कि,” नामांकित डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पीटल्सचा भाग होतांना आम्हाला खुप आनंद होत आहे.आमची रुग्णालये एनएबीएच मानांकित व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी आहेत.सेंटर्सच्या माध्यमातून यापुढेही रुग्णांना ३६० अंशांचा बहुआयामी नेत्रसेवा पुरवित राहाणार आहे. एकाच छताखाली आम्ही नेत्रशस्त्रक्रिया, कॅटारॅक्ट सर्विसेस, लेसर कॅटारॅक्ट सर्जरी, रेटिना ॲण्ड कॉर्निया सर्व्हीसेस, ग्लूकोमा प्लास्टिक सर्जरी, चष्मा घालवण्याची लासिक सर्जरी यांसारख्या शस्त्रक्रियांच्या माध्यमातून रुग्णसेवा अवितरपणे करत राहाणार आहेत . ”
डॉ. अग्रवाल्स आय केअर सेंटर्सचा सध्या ११ देशांमध्ये विस्तार असून, ४०० तज्ज्ञांची टीम आरोग्यसेवेत आपले योगदान देत आहे. १.२ कोटीहून अधिक रुग्णांची सेवा या टीमच्या माध्यमातून झालेली आहे. रुग्णालयाकडून नेत्रसुविधांसोबत ॲकॅडमिक व संशोधन योजनादेखील उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News