नाशिक : राष्टृीय स्तरावर बँकींग क्षेत्रात अमुलाग्र योगदान देतांना ग्राहकसेवेसाठी सदैव तत्पर असलेलले भारतीय स्टेट बँक सामाजिक बांधिलकीदेखील जपत आहे. बँकेकडून श्री सप्तशृंग निवासिनी देवी टृस्ट,वणी यांना सीएसआर निधीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी कार्डियॅक ॲम्ब्युलन्स भेट म्हणून देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा गडावर येणा-या भाविकांकरिता आपात्कालीन परिस्थितीत उपयोग होणार आहे. भारतीय स्टेट बँकेचे महाराष्टृ सर्कल नेटवर्क दोनचे महाप्रबंधक श्री.राजेश कुमार यांच्या हस्ते रुग्ण्वाहिका टृस्टच्या पदाधिका-यांना सूपुर्द करण्यात आली. या कार्यक्रमास भारतीय स्टेट बँकेचे नाशिक अंचलित कार्यालयाचे उपमहाप्रबंधक श्री.मुकेश कुमार सिंग,क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय नाशिक ग्रामीणचे सहाय्यक महाप्रबंधक श्री.सुशील कुमार, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय नाशिकच्या सहाय्यक महाप्रबंधक श्रीमती सिताक्षी सिंग आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी देवस्थान टृस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिक व अतिरिक्त सत्र न्यायधिश वर्धन देसाई यांना रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. या वेळी टृस्टचे विश्वस्त व कळवणचे तहसिलदार श्री.कापसे, ललित निकम, भुषणराज तळेकर, डॉ.दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ.प्रशांत देवरे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे आदी उपस्थित होते. वर्षभर राज्य व देशभरातील भाविक गडावर दर्शनासाठी येत असतात. लहानांपासून ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील भाविकांचा यात समावेश असतो. यापैकी एखादया भाविकास वैदयकीय आवश्यकता भासल्यास ही अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त अशी ही रुग्णवाहिका भाविकांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध असणार आहे. यापूर्वीदेखील एसबीआयकडून सीएसआय निधीअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्रयंबकेश्वर देवस्थान टृस्टलाही सीएसआर निधीतून उपकरण स्वरुपात मदत करण्यात आली होती.अशाच प्रकारे सी एस आर अंतर्गत द ब्लांइड वेलफेयर ऑरगॅनिझशन नाशिक याना ब्रन लिपीतील होम सायन्स अँड फिजिओलॉजि दहावीचे ६०० पुस्तके प्रदान करण्यात आले. सदरचा कार्यक्रम एसबीआय बँक टृेझरी शाखेच्या १०० व्या वर्धापन दिना निमित्ताने औचित्य साधून जिल्हाधिकारी सुरज मांढरे,जिल्हा परिषद कार्यकारी अधिकरी लीना बनसोड तसेच अभय वाघवसे- मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश् नाशिक व एसबीआय नेटवर्क २ महाराष्टृाचे महाप्रबंधक राजेशकुमार यांचे हस्ते,संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय घाडगे व अरुण भारस्कर याना प्रदान करण्यात आले.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





