नॅपकिनविषयी जनजागृती करण्याचे काम कृषी प्रसार फाउंडेशनच्या हाती

Mar 11, 2022

Nashik : ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींनी आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी तसेच पाच दिवस सॅनिटरी नॅपकिनचाच आवर्जून वापर केला जावा यासाठी शहरातील तरुण-तरुणींना सोबत घेत गाव,वाडी, वस्ती, पाड्यांवर जाऊन नॅपकिनविषयी जनजागृती करण्याचे काम कृषी प्रसार फाउंडेशनने हाती घेतले आहे.

कृषी प्रसार फाउंडेशनने फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने नाशिक जिल्हयातील गिरनारे गावात जागतिक महिला दिन गावातल्या महिलांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला.महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर तसेच सॅनिटरी नॅपकिन पॅडचे वाटप करण्यात आले.त्यास गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

– ग्रामीण भागातील महिलांत हा उपक्रम रुचेल की नाही याबाबत साशंकता होती, परंतु त्या मानाने आम्हाला चांगला प्रतिसाद लाभला. महिला मुलींनी त्यांच्या अनेक समस्या सांगत निरसन केले. – अलका दिवे, सरपंच गिरणारे ग्रामपंचायत

-महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आशा उपक्रमाची गरज होती या विषयावर कोणीच मोकळेपणाने बोलत नव्हते. मात्र,जनजागृती सुविधा उपलब्ध झाल्याने गावाकडच्या महिलांसाठी हे फायद्याचे ठरले आहे-मार्वान पटेल,हेड ऑफ मार्केटिंग,फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स प्रा.लि.

-छोट्या गावातील महिलांमध्ये पॅडऐवजी कापड वापरण्याची आज देखील परंपरा आहे. त्याबाबत गैरसमजुती आहेत. त्या घालवण्यासाठी जनजागृती सोबतच आम्ही गावात नॅपकिन्सची सुविधा देत आहोत. हळूहळू प्रत्येक जणी नॅपकिन्स वापरतील आणि आपल्या आरोग्याची, स्वच्छतेची काळजी घेतील असा आमचा प्रयत्न असणार आहे-हर्षल मोरे,अध्यक्ष कृषि प्रसार फाउंडेशन

सदर कार्यक्रमाप्रसंगी फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स प्रा.लि. हेड ऑफ फायनान्स संदेश नार्वेकर, हेड ऑफ मार्केटिंग मार्वान पटेल,गिरणारे ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका दिवे, उपसरपंच छबुताई आत्माराम थेटे,पंचायत समितीच्या सदस्या छाया डंबाळे ,कविता बेंडकोळी,माजी बॅडमिंटन खेळाडू निर्मला कोटणीस,डॉ.स्मिता सोपे,अर्पणा खोसकर,प्रीतम आढाव,कु.श्रेया आढाव,चैताली विशाल गडलिंग आदींसह गावातील आशा वर्कर,शाळेतील शिक्षिका, रुग्णालयातील डॉक्टर,सिस्टर आदींसह युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास सातशे ते आठशे महिलांनी उपस्थिती नोंदवली होती.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी प्रसाद फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षल मोरे ,विशाल गडलिंग,पंकज कर्पे,मनीष कोकाटे, अनुराग मोडक, प्रवीण निकम, आकाश सरोदे,अनिल थेटे,सुमित गायकवाड,
भैया कोरडे,सागर थेटे आदींनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News