शरीरातील विषारी द्रव्य काढण्याकामी असरदार ; गोकर्णी वनस्पती अनेक रोगांवर लाभदायी

Jul 17, 2019

भारतात आजही दुर्गम ग्रामीण भागात दवाखाने व डॉक्टरे कमी असल्यामुळे अनेक लोकांना उपचारा अभावी वंचित राहावे लागते. परंतु प्रक्रतिने अनेक झाडांचे संवर्धन करुन आपल्याला औषधी भंडार दिलेला आहे. प्राक्रतिक झाडांचा वापर करुन आपण विविध आजारांवर प्राथमिक उपचार अथवा असरकारक आयुर्वेदिक उपाय करु शकतो. प्रक्रतिने विविध झाडांमध्ये अनेक औषधि गुण दिलेले आहे.आपल्या अवतीभवती औषधी भंडार असतांना माहिती अभावी सामान्य जनता यापासून इलाज करत नाही.अशीच विविध औषधी गुणांनी पुरीपुर्ण वनस्पती गोकर्णीची माहिती जाणून घेणार आहे. आपल्याला गोकर्णी वनस्पती बदल माहिती असेलच. गोकर्णीचे झाड दोन प्रजातीचे भारतात आढळते. एक सफेद तर दुसरे नीले अंतरंग सफेद फुले असणारी गोकर्णी.हे दोन्ही रंगाचे फुले भगवान महादेवाला प्रिय आहे.फुलांचा आकार शंखासारखा असतो. तर पाने गोलाकार हिरवे मेथीच्या भाजीसारखी.ही वनस्पती खास करुन भारत,मिस्त्र, अफगाणिस्तान, फारस, मसोपोटामिया,इराक इत्यादी देशात अढळते. झाडाचा औषधी उपयोग खास करुन शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी केला जातो.काही
ठिकाणी साप चावल्यावर विष बाहेर काढण्यासाठी शरीरातून व चावल्या जागेवर देखील गोकर्णीचा औषधी म्हणून उपयोग करतात.
गोकर्णीचे शेंगा,फुले आदि येतात. शेंगाचा 8 ते 10 थेंब जर रोज नाकात घातले तर आयुर्वेदातील नस्य सारखे लाभ घेउन अर्धडोकेदुखी पासून मुक्ती मिळविता येते. त्याचबरोबर कानात देखील याचे थेंब टाकल्यास कान दुखी पासून आराम मिळतो.
जाणून घेऊ गोकर्णीचे औषधी उपयोग
1) गोकर्णीचा उपयोग साधारण: शरीर शुध्दीसाठी केला जातो. आयुर्वेदात पंचकर्म करण्यासाठी खास करुन उपयोगात आणली जाते. शरीरात अनेक दिवसांपासून जमा झाले विष बाहेर टाकून शरीरशुध्दी करण्यासाठी गोकर्णीचा उपयोग केला जातो.
2) रक्तातील विषारी द्रव्य बाहेर फेकण्यासाठी गोकर्णी वापरत असल्यामुळे मानवी शरीरातील नर्वस सिस्टम ठीक करण्यासाठी यावनस्पतीचा रस फार महत्वाचे उपयोगी काम करते .
3) मेंदू रोग संबधित जवळजवळ सर्वच आजारांवर याचा उपयोग होतो.जसे विसराळूपणा, वाचलेले न आठवणे आदी मुलांचे समस्यांवर गोकर्णीद्वारे औषधी उपाय करता येतात.
4) आवाजा संबधित स्वरयंत्र, गळयाचे आजार बरे करण्यासाठी लाभकारी.झाडाची मुळीची पावडर तुपात मिश्र करुन घेतल्या घास दुखी पासून आराम मिळतो.
5) गोकर्णी वनस्पतीची मुळीचा लेप करुन त्वचेवर लावल्यास किंवा चेह-यावर लावल्यासव चमक वाढते, तसेच डोळयांसाठी थंडदार असून डोक्यांची ताकद वाढीसाठी फायदेशीर आहे.
6) एंटी- इनफलेममेट्री तत्व गोकर्णी मध्ये असल्यामुळे शरीराला आलेली सुज,मुक्का मार झाडाची पेस्ट करुन लावल्यावर बरे करता येते.
7) अपचन समस्या कमी करुन आतडयांची ताकद वाढविते ज्यामुळे शौच मोकळी होण्यास मदत होते.
8) गोकर्णीच्या पानांचा काढा करुन पेल्यास ताप, जुलाब, गॅस्ट्रो, उल्टी, मळमळ सारखे आजारांवर औषधी उपचार म्हणून फायदा होतो.
9) गोकर्णीचा पाने चहामध्ये टाकून नेहमी पेत राहिल्यास हदय रोग व श्वसनसंबधि आजार कमी करता येतात.
10) गोकर्णी वनस्पती मुळे पुरुषांमधील स्पर्म वाढविता येतात, नपुंसकता चे आजारावर विकल्प म्हणून वापर करता येतो. झाडाची पावडर मधाबरोबर दररोज घेतल्यास पुरुषांची लैकिंक शक्तीत वाढ होते.
11) गोकर्णीत रक्तशुध्द करण्याचे तत्व असल्यामुळे प्राक्रतिक टॉनिक म्हणून याचा वापर करता येतो. हयाचे रसाचे नेहमी सेवन केल्याने रक्त शुध्द होउन त्वचेवरील फोड-पुरळ,पिम्पल्स कमी करता येतात.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News