नाशिक : मूत्रपिंडाची (किडनी) विकाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता नाशिक किडनी फाउंडेशन आणि सुप्रीम किडनी केअर ह्यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १८ मार्च रोजी साय. ४. ३० वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, नाशिक येथे किडनी विकार – निदान, उपाय आणि उपचार ह्या वर तज्ञाचे मार्गदर्शन ठेवले आहे ह्यात लहान मुलांमधील किडनी विकार ह्यावर मार्गदर्शन डॉ कुमुद मेहता – मूत्रपिंड बाल विकार तज्ञ् मुंबई हे करणार असून मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी उपाय – डॉ मोहन राजापूरकर – जेष्ठ मूत्रपिंड विकार तज्ञ्, नडियाद, गुजरात हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दिनांक १९ मार्च रोजी मूत्रपिंड विकार जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शन कुलकर्णी गार्डन, शरणपूर रोड येथे मांडण्यात येणार आहे ह्याचे उदघाटन डॉ. अशोक कृपलानी – जेष्ठ मूत्रपिंड विकार तज्ञ्, मुंबई ह्यांचे शुभ हस्ते होणार आहे. अशी माहिती डॉ. देवदत्त चाफेकर, सुप्रीम किडनी केअर ह्यांनी दिली. ह्या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले मूत्रपिंडाची (किडनी) योग्य वेळी योग्य ती काळजी न घेतल्याने शरीरासाठी घातक ठरु शकते. बदलेलती जिवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मूत्रपिंड आजाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय विज्ञानव्दारे मूत्रपिंडचा ‘क्रॉनिक किडनी आजार’ (CKD) समोर आला आहे. या आजारात मूत्रपिंड काम करणं बंद करते. या आजाराबद्दल जागरुकता पसवरण्यासाठी १४ मार्च ‘जागतिक मूत्रपिंड दिवस’ साजरा केला जातो हया बाबत अधिक माहिती साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ह्याचा लाभ नाशिककरांनी घ्यावा आणि किडनी विकार बद्दल वेळीच सजग होवून होणारा दुष्परिणाम टाळावा.
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ
नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...





