पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता

May 10, 2022

केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना घेता येणार मोफत उपचार

नाशिक : शहरातील नामांकित पायोनिअर हार्ट हॉस्पिटलला सेंटर गव्हर्नमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस)ची मान्यता मिळाली आहे. हॉस्पिटलला सीजीएचएसची मान्यता मिळाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या सेवेत सध्या कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचार्‍यांचे मोफत उपचार पायोनिअर हार्ट हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. पायोनिअर हार्ट हॉस्पिटल नाशिकमधील अग्रगण्य असून गेल्या ३ वर्षांपासून हृदयरोगावरील उत्कृष्ट सेवा देणारे हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास इमर्जन्सी उपचार,एन्जीओप्लास्टी तसेच बायपास(सिएबीजी)शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे केल्या जातात. डॉ. सुरेश सूर्यवंशी या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख असून हृदययावरील उपचाराचा त्याना प्रदीर्घ अनुभव आहे.
डॉ. ललित लवणकर हे उत्तर महराष्ट्रातील एकमेव बालहृदय रोग तज्ज्ञ आहेत. नवजात शिशू मधील हृदयरोगावरील विविध उपचार करण्यात ते निपुण आहेत. हॉस्पिटलमधील अवघ्या ९५० ग्रॅम वजनाच्या बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी या गोंडस शिशूला नवजीवन दिले आहे. बाळांच्या अशा हृदय आजारावरील क्लिष्ट आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्यांनी अनेक बाळांना नवसंजीवनी दिली आहे.
हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम आणि अनुभवी डॉक्टरांचा चमू रुग्णसेवा देत असून त्यामधे हृदयशल्यविशारद डॉ. नितीन ठाकरे आणि डॉ. निलेश पूरकर या दोन्ही तज्ज्ञाचा बायपास, हृदय झडपांच्या शस्त्रक्रियांसह इतर अनेक अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात हातखंडा आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध असून उच्च वैद्यकीय नीतिमत्ता जोपासून रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टरांसह सर्व स्टाफ कटिबद्ध असतो.
सेंटर गव्हर्नमेंट हेल्थ स्किम मुळे आता केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा रुग्णांना होणार आहे. पायोनिअर हार्ट हॉस्पिटलमध्ये सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अनेक गोरगरीब रुग्णांवर उपचार केले जातात. त्यासाठी दिल दोस्ती फाऊंडेशन आणि अशा सेवाभावी संस्थाचे सहकार्य नियमित लाभत असते. या वेळी डॉ. .सुरेश सुर्यवंशी, डॉ. ललित लवणकर, डॉ. नितीन ठाकरे, डॉ. वैशाली अग्रवाल, डॉ. निलेश चव्हाण उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News