वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नर्सेस डे उत्साहात साजरा

May 11, 2022

नाशिक : जागतिक परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट ग्रुप हॉस्पिटलमध्ये परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना काळातील केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल सर्व नर्सिंग कर्मचाऱ्यांचा कामाचा यावेळी आदर करण्यात आला. तसेच कोविड काळात मृत्यूमुखी पावलेल्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. तणावातून बाहेर येत नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा देणाऱ्या या सोहळ्यात वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या नाशिक, मीरा रोड, मुंबई सेंट्रल, नागपूर आणि राजकोट येथील केंद्रांमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि गैर-वैद्यकीय कर्मचारी तसेच ९०० परिचारिकांच्या उपस्थितीत त्यांना मदत करणारा कर्मचारीवर्ग सहभागी झाला होता. ‘नर्सेस: लीड टू लीड’ अशी या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या उपक्रमाची संकल्पना होती.

जगभरातील नागरिकांचे आरोग्य आणि त्यातून त्यांच्या कल्याणाचा विचार करीत असताना त्यात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांच्या या कामाची दखल घेत परिचारिकांचे कौतुक करण्यासाठी आठवडाभर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस नर्सिंगची प्रतिज्ञा आणि त्यानंतर नर्सिंग प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र वोक्हार्ट हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक सुश्री झाबिया-खोराकीवाला आणि ग्रुप क्लिनिकल डायरेक्टर आणि सीओओ डॉ. क्लाईव्ह फर्नांडिस यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. सेल्फी, पोस्टर पेंटिंग, गायन स्पर्धा, विविध कलागुण दर्शन आणि नृत्य यांसारखे विविध उपक्रम कार्यक्रमादरम्यान पार पडले.

यावेळी खोराकीवाला म्हणाल्या की आपल्या कामात सर्वात समर्पित राहत समाजाची काळजी घेणाऱ्या आणि कायम पडद्यामागे राहणाऱ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. हॉस्पिटल बनवण्यापासून त्याद्वारे चांगल्या सेवा पुरविण्यात परिचारिकांचे अथक परिश्रम असतात. त्यांच्या योगदानाचा अर्थ केवळ रुग्णांसाठीच नाही तर रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी यांच्यासाठी आहे. कारण ते शक्य तितक्या सर्वोत्तम मदत करण्यासाठी अथकपणे काम करतात.

डॉ. फर्नांडिस म्हणाले की जगभरातील परिचारिका रुग्णांची सहानुभूतिपूर्वक काळजी घेतात. कोरोनाकाळात त्यांचे हे काम अधिक स्पष्टपणे दिसून आले. या वाईट काळात देखील त्यांनी रुग्णांना प्रथम स्थान दिले. त्यामुळे आमच्या परिचारिकांनी आम्हाला खरोखर अभिमान वाटला आहे. मी त्या सर्व परिचारिकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी त्यांच्या रुग्णांच्या कल्याणासाठी नेहमीच सर्वोत्तम प्रयत्न केले. रूग्णालयात रुग्ण बरा होत असताना त्यांच्या हाताला धरून त्यांना आश्वासक हसू देण्याचे काम आमच्या रुग्णालयातील परिचारिकांनी केले. रुग्णांना दर्जेदार काळजी देणाऱ्या आरोग्य सेवा संघाचा मुख्य भाग परिचारिका असतात.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News