नाशिक : आळंदी परिसर विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या चेअरमन पदी श्री. शंकरराव रामभाऊ कसबे तर व्हाईस चेअरमन पदी श्री. दत्तु दगडु कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्था कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालय मार्फत श्रीमती वृषाली मैड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. २७ मे २२ रोजी आळंदी परिसर संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सुरु केल्यानंतर चेअरमन पदासाठी श्री. शंकरराव रामभाऊ कसबे तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. दत्तु दगडु कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे अध्यक्ष अधिकारी श्रीमती मैड यांनी जाहीर केले. यावेळी नवनिर्वाचित संचालक श्री. एकनाथ कसबे, मोतीराम दगु कसबे, ज्ञानेश्वर कसबे, संतोष कसबे, शिवाजी कसबे, सुरेखा कसबे, विठाबाई कसबे, विष्णु लोखंडे, वाळु कसबे, अनंत कसबे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






