सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे हार्मोन्स अ‍ॅन्ड डायबेटिस क्लिनिक सुरू

May 25, 2022

नाशिक : सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे हार्मोन्स अ‍ॅन्ड डायबेटिस क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले.या अद्ययावत केंद्रामध्ये मधुमेह व्यवस्थापनाशी निगडीत सर्वकांश सेवा उपलब्ध असून त्यामध्ये तज्ञांचा सल्ला,डोळ्यांची तपासणी,हृदयरोग तज्ञ,नेफ्रोलॉजिस्ट,डायबेटिक फूट सर्जन,आहारतज्ञ,मधुमेहाशी निगडीत गुंतागुंतींसाठी चाचण्या यांचा समावेश आहे.हे केंद्र सह्याद्रि हॉस्पिटल्स,पुणे येथील हार्मोन्स अ‍ॅन्ड डायबेटिस क्लिनिकच्या एंडोक्रिनोलॉजिस्टशी संपर्कात असेल.या केंद्रामध्ये नमुने घेण्यासाठी मोफत सेवा,औषधांची मोफत होम डिलिव्हरी या सेवा प्रदान केल्या जातील.

जगभरात भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जात असून सुमारे 12% प्रौढ व्यक्ती या मधुमेहाने ग्रस्त आहेत.सह्याद्रि हॉस्पिटल्समधील एंडोक्रिनोलॉजिस्ट व डायबेटोलॉजिस्ट डॉ.उदय फडके म्हणाले की,टाईप 2 मधुमेहाची समस्या ही आता केवळ शहरी भागापुरती मर्यादित राहिली नसून ग्रामीण भागातही दिसून येत आहे. भारतीयांना मधुमेहाचा धोका अधिक आहे. एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचे निदान झाले की,पुढील व्यवस्थापनासाठी संरचित कार्यक्रम त्या रूग्णाद्वारे अवलंबिला गेला पाहिजेे,जे आपल्या येथे सहसा दिसून येत नाही. या आजाराची लक्षणे सहसा दिसून येत नसणारी,लोकांचे नियमित पाठपुरावा व उपचार करण्याकडे असणारे दुर्लक्ष या कारणांमुळे अनेक गुंतागुंत होण्याची जोखीम वाढू शकते. आमचे उद्दिष्ट मधुमेही रूग्णांसाठी पहिल्यापासूनच उपचारासाठी संरचित कार्यक्रम आणि स्पष्ट आराखडा तयार करणे हे आहे. त्यासाठी आम्ही एकाच छताखाली सर्वसमावेशक सेवा प्रदान करत आहोत. याशिवाय गरज पडल्यास पुण्यातील एंडोक्रिनोलॉजिस्टच्या टीमबरोबर टेलि-कन्सल्टेशन सुविधा देखील उपलब्ध असेल.

उपचारामध्ये सुरूवातीला घेण्यात येणार्‍या चाचण्यांदरम्यान डोळे, हृदय,मुत्रपिंड, नसा, रक्ताभिसरण आणि पायाच्या आरोग्याची स्थिती याबद्दल जाणून घेतले जाईल. यासंबंधी माहिती उपलब्ध झाल्यानंतर योग्य उपचारांचे नियोजन करण्यात येईल. योग्य पाठपुरावा,अचूक वैद्यकीय परीक्षण आणि उपचार करण्यासाठी रूग्णाची माहिती इलेक्ट्रॉनिक पध्दतीने जमा केली जाईल. नाशिकच्या बाहेरून येणार्‍या रूग्णांच्या सोयीसाठी लॅबमधून अहवाल येण्यासाठी लागणारा कालावधी कमी केला गेला असून त्यामुळे रूग्णांना त्याच दिवशी आपल्या घरी परत जाता येईल.

तज्ञांच्या टीममध्ये दैनंदिन व्यवस्थापन हे मधुमेह तज्ञ डॉ.भाग्यश्री पाटील व फिजिशियन डॉ.अभिषेक पिंप्राळेकर पाहतील. सह्याद्रि हॉस्पिटल्स नाशिकच्या क्रिटिकल केअर विभागाचे संचालक व प्रसिध्द फुफ्फुस तज्ञ डॉ.भरत त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा प्रदान केल्या जातील. तज्ञांच्या टीममध्ये पुण्यातील एंडोक्रिनोलॉजिस्टस डॉ.उदय फडके,डॉ.सजल कामत आणि डॉ.मधुरा करगुप्पीकर हार्मोनशी निगडीत असलेल्या समस्यांसाठी सल्ला देतील.

सह्याद्रि हॉस्पिटल नाशिकचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ.संजय चावला म्हणाले की, हार्मोन्स अ‍ॅन्ड डायबिटीस क्लिनिक हे नाशिक आणि पुणे येथील तज्ञ डॉक्टरांचे सांघिक कार्य आहे, जिथे आम्ही एकाच छताखाली मधुमेहासाठी सर्वसमावेशक देखभाल सेवा प्रदान करणार आहोत. रूग्णांच्या सोयीकरिता लॅब नुमने मोफत गोळा करणे आणि औषधांची मोफत घरपोच सेवा यासंारख्या सहाय्यक सेवांचा समावेश करण्यात आला आहे.सर्वसमावेशक आणि संरचित उपचार सेवा देण्याबरोबरच लोकांना मधुमेहाबद्दल जागरूक करणे आणि भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे हा आमचा उद्देश आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News