जांबुटके येथे साकारणार पहिले औद्योगिक क्लस्टर; आदिवासींच्या कलागुणांना मिळणार व्यापक बाजारपेठ :नरहरी झिरवाळ

May 28, 2022

आदिवासी रूढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार व प्रसिद्धीसाठी नाशिक येथे ‘आदी महोत्सव २०२२’ चे आयोजन

नाशिक – शहरी भागात आदिवासी जमात आदिवासी रूढी, परंपरा, कला लुप्त होतं चालली आहे. राज्यातील आदिवासी रूढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार व प्रसिद्धीच्या उद्देशाने शुक्रवार (ता.२७) नाशिक येथे पाच (२७ मे ते ३१ मे २०२२) दिवसीय आदिवासी आदर्श संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेच्यावतीने- सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव गोल्फ क्लब मैदान येथे पार पडणार आहे आणि या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा, लघूपट महोत्सवाचा समावेश आहे. याशिवाय आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गवताच्या वस्तू, वेतकाम, बांबूकाम, काष्ठशिल्पे, धातुकाम, मातीकाम, वनौषधी व लाकडी लगद्याचे मुखवटे मोहसत्वाचे आकर्षण ठरणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते झाले.
“आदि महोत्सव – २०२२” अंतर्गत आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धा व आदिवासी जीवनावर आधारित लघुपट विनामुल्य पहता येणार आहेत.
यावेळी, श्री. हिरालाल सोनवणे, आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, श्री. डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, श्री विकास मीना ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक ,श्री संदीप गोलाईत, अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक श्री. हंसध्वज सोनवणे, उपसंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे , श्री. विजय डगळे, सांस्कृतिक अधिकारी ,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते,


यावेळी विधानसभा उपाध्यक्ष म्हणाले की, आदिवासी बांधवांमध्ये कला व कौशल्य उपजतच असून जांबुटके येथे साकारण्यात येणाऱ्या औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होणार आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या आदिवासी उद्योजकांना आपल्या कलावस्तू विक्रीसाठी संधी असणार आहे. त्यांना या ठिकाणी उद्योगासाठी लागणारे भांडवल, जागा, वीज व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या ठिकाणी नाशिकसोबतच महाराष्ट्रातील इतर आदिवासी जिल्ह्यातील तरूण उद्योजकांना सुध्दा रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले, 27 मे 31 मे 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या आदि महोत्सवास सर्वांनी भेट द्यावी. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी तरूण बांधवानी मनातील न्युनगंड दूर करून व्यवसायाभिमुख व्हावे हाच प्रयत्न आहे. या ठिकाणी विक्री करतांना आदिवासी तरूणांनी बोलते होत पुढे आले पाहिजे. आदिवासी बांधवांनी पिकविलेला सेंद्रीय भाजीपाल्यास कोरोना काळातही विशेष मागणी झाली आहे. श्री. नरहरी झिरवाळ यांनी आज या ठिकाणी उभारलेल्या 36 स्टॉलला भेट दिली व स्टॉलधारकांशी संवाद साधला.

आदिवासींच्या संस्कृतीचे जतन व विकास समान पातळीवर होण्यासाठी सदैव प्रयत्नशील :डॉ. राजेंद्र भारूड

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त (भा.प्र.से) डॉ. राजेंद्र भारूड, यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, कोविड निर्बंध खुले झाल्यानंतर प्रथम पुणे शहरा सोबतच प्रकल्प स्तरावर जव्हार भामरागड,पांडरकवडा येथे प्रकल्प स्तरावर अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले आहे. राज्यात आदिवासी 9 ते 10 टक्के आदिवासी आहेत. त्यांच्या संस्कृतीचे जतन व विकास हा समांतर व्हावा यादृष्टीने सदैव प्रयत्नशील असून, त्यासाठी अशा प्रकराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पाच दिवसीय आयोजित महोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या

स्टॉलधारकांना 60 टक्के निधी डि बी टी च्या माध्यमातून दिला जातो यासोबतच त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था व प्रवासभत्ता सुद्धा दिला जातो. या प्रदर्शनात आदिवासी हस्तकलांचे भव्य प्रदर्शन व विक्री, आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धां व आदिवासी लघुपट महोत्सव यांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धकांना रोख रक्कम व पारितोषिक यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News