शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची : साहेबराव जगताप

May 30, 2022

जुन्या आठवणींना उजाळा देत एक पाऊल सेवानिवृत्तीच्या दिशेने…

नाशिक : नेहमी सर्वांशी मनमिळावू,जीवाभावाचे प्रत्येकाशी नाते जोडणारे सर्व पत्रकारांचे परिचित व्यक्तीमत्व म्हणजे श्री. साहेबराव जगताप. आज त्यांच्याविषयी विशेष लिखाण करण्याचे कारण म्हणजे आगामी येणा-या दिनांक 31 मे 2022 रोजी श्री. जगताप 28 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिृत्त होत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचानलाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्या अधिनस्त प्रकर्षित प्रसिद्धी पथक कार्यालय, नवापूर, जि.धुळे येथून शासकीय सेवेची रंगीत तालीम सुरु ठेवून आज त्यांचा शेवट अतिशय गोड पद्धतीने नाशिकच्या जिल्हा माहिती कार्यालय, येथून सिनेयंत्रचालक पदावरुन सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
साहेबरांवाच्या बाबत थोडक्यात सांगायचे तर, ऐवढेच आहे की एका छोट्याशा दुर्गम आदिवासी भागातील कळवण तालुक्यातील येथील पाटविहीर या गावात त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थितीत जरी नाजूक असली तरी ईश्वरीय कृपने लहानपण खेळीमेळीने व आनंदात गेले. शिक्षणाच्या बाबतीत सांगायाचे झाले तर बी.ए (बी.जे ) पुर्ण केल्यानंतर म्हणतात ना शासकीय नोकरी मिळणे सोपे नाही त्याला कुंडलीत चांगला योग असावा लागतो. अन् दैवाची साथ मिळताच संधीचे सोने करुन साहेबराव २८ वर्षांची शासकीय सेवेतून येत्या 31 मे, 2022 रोजी सेवामुक्त होत आहे.
आजच्या धकाधकीच्या काळात शासकीय नोकरी करणे फार अवघड बाब आहे. अनेकांना सेवा बजावतांना अडचणी येतात. परंतू साहेबरावांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की ” माझ्या २८ वर्षांच्या कालावधीत सेवा बजावतांना कोणताही डाग अथवा कलंक लावून घेतला नाही, ही माझी सर्वात जमेची मोठी बाजू असून माझ्या सेवेतून मिळणाऱ्या पगाररुपी आर्थिक मोबदल्यात मी माझ्या मुलाबाळांचे पालण-पोषण केवळ चांगल्याच प्रकारे केले नाही तर त्यांना उच्च शिक्षित बनवले याचा मला अभिमान आहे. मुलगा चि. धिरज साहेबराव जगताप हा मॅकेनिक इंजिनिअर झालेला असून तो पुणे येथील यशदा संस्थेने नुकतीच त्याची अदिवासी उमेदवरांमधुन यु.पी.एस.सी. च्या प्रशिक्षणासाठी निवड झालेली असून तो शिक्षण घेत आहे. तो नक्की अधिकारी होऊनच बाहेर पडेल याची मला खात्री आहे. सौ. योगिनी जगताप -चव्हाण हिचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण घेऊन विवाहबद्ध झालेली आहे. तर तिची सुध्दा यशदा संस्थेने पुणे येथे एस.बी.आय बँक मध्ये पी.ओ. प्रोबेशन ऑफिसर या पदाकरिता प्रशिक्षण निवड झाली आहे.
माहिती व जनसंपर्क विभाग हा शासनाच्या योजना व माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा विभाग म्हणून मानला जातो तसेच हा विभाग शासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. त्या अनुषंगाने साहेबरावांचे कामाचे स्वरुप होते. सदरची सेवा बजवितांना त्यांना धुळे, नंदुरबार,जळगाव येथील जिल्हांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ह्याच ठिकाणी सिनेयंत्रचालक कम पर्यवेक्षक या पदावर तळोदा येथे काम करण्याचे भाग्य प्राप्त झाले. तसेच नवापूर येथे प्रकर्षित प्रसिद्धी पथकामध्ये प्रभारी माहिती सहायक म्हणून काम करता आले. सन 2016 ला जळगाव मधून नाशिक येथे जिल्हा माहिती कार्यालय येथे बदली झाल्यानंतर टी.व्ही कॅमेरामन, शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य वितरण विभाग नाशिक या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. शासनाच्या योजनांचा प्रचार, मेळावे, स्टॉल, कलापथक यासंबंधी देखील कामाची धूरा त्यांनी सांभाळला.
आज दिनांक 31 मे 2022 रोजी नाशिक येथील माननीय जिल्हा माहिती अधिकारी श्री. रणजितसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्ती घेत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटनेचे (नाशिक विभाग) अध्यक्ष श्री. राजू अण्णा चौघुले व संघटनेचे सचिव, पदाधिकारी यांनीही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक येथील अधिकारी व कर्मचारी वर्गांकडूनही त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

– साहेबराव जगताप
                                                                             सिनेयंत्रचालक
                                                                  जिल्हा माहिती कार्यालय,नाशिक

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News