आदि महोत्सव २०२२ : पाच दिवसात ९० आदिवासी हस्त अन्‌ ६१७ नृत्य कलाकारांचा सहभाग

Jun 1, 2022

नाशिक : वारली चित्रकला, बांबूच्या व वेताच्या वस्तू, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी दागदागिने, कागदी फुलांचे मुखवटे अशा विविध हस्तकलांसह पाच दिवसीय महोत्सवात ६१७ आदिवासी नृत्य कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवली ती नाशिकच नव्हे तर राज्यभरातून आलेल्या विविध भागातील कुटुंबीयांनी.

आदिवासी हस्त व नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे (पुणे) च्या वतीने ‘आदि महोत्सव २०२२’ चे आयोजन नाशिक शहरातील गोल्फ क्लब प्रांगणावर दिनांक २७ ते ३१ मे या कालावधीत करण्यात आले होते. महोत्सवाचा मंगळवारी (ता.३१)समारोप करण्यात आला. या महोत्सवांतर्गत आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा व आदिवासी जीवनावर आधारित लघुपट विनामूल्य दाखविण्यात आले. टी आर टी आय संस्थेच्या वतीने आयोजित महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिक, कलासमीक्षक, संग्राहक व कलाकुसरीचे प्रेमी यांना शासनाच्या माध्यमातून जणू हि पाच दिवसीय मेजवानीच होती.
या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथून एकूण ९० आदिवासी हस्त कलाकारांना व ६१७ नृत्य कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. महोत्सवात वारली चित्रकला, बांबूच्या व वेताच्या वस्तू, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी दागदागिने, कागदी फुलांचे मुखवटे, इत्यादी हस्तकलांचा प्रदर्शनात समावेश होता.
महोत्सवाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड (पुणे), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, अपर आयुक्त संदीप गोलाईत (नाशिक), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक हंसध्वज सोनवणे, सांस्कृतिक अधिकारी विजय डगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आदिवासी नृत्य स्पर्धा झाल्या. सात आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही विविध आदिवासी नृत्य प्रकार सादर झाले. सोबत या ठिकाणी विविध वस्तूंचे स्टॉल देखील प्रथम दिवसापासून लावण्यात आले होते. सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत महोत्सव सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला होता. नाशिक मधील नागरिकांना वेगवेगळ्या आदिवासी वस्तूंचे नमुने बघायला आणि खरेदीचा आनंद घेता आला. तिसऱ्या दिवशीही वेगवेगळे नृत्य सादर झाले. यात पेरणी नृत्य, ढेमसा नृत्य, गुसाडी ढोल, नाच मोर का नाच, जंगो लींगो, संसारी माता, ढोल नाच, वरसुबाई, लेझीम पथक आदींचा समावेश होता.
प्रदर्शनात विक्रीसाठी असलेल्या कलाकृती मध्ये हस्तकला , आदिवासी पुस्तके, बांबू आर्ट, वॉल पेंटिंग, वारली पेंटिंग, पेन स्टँड, किचन फुलदाणी, फुले, कपडे, साड्या, शोच्या वस्तू यांचा समावेश होता. खाद्य प्रेमींसाठी चुलीवरचे चिकन, खेकडे, कोळंबी, सुकट भाकरी, नागलीची भाकरी, ठेचा, पिठलं अशा विविध पदार्थांची मेजवानी होती. आदिवासी कलाकारांनी त्यांची कलाकारी सादर करून येथील प्रेक्षकांचे मन जिंकले.

मंगळवारी सायंकाळी झाला समारोप
मंगळवारी (ता.३१) संध्याकाळी सहा वाजता बक्षीस वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड (पुणे), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, अपर आयुक्त संदीप गोलाईत (नाशिक), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक हंसध्वज सोनवणे, सांस्कृतिक अधिकारी विजय डगळे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (नाशिक विभाग) चे सहआयुक्त किरण माळी, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त अविनाश चव्हाण, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, सहसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.


नृत्य स्पर्धेतील विजेत्ये असे
प्रथम पारितोषिक (रूपये पंचवीस हजार) : वरी बाबुराव शेडमाके पथक (घुसाडी नृत्य, यवतमाळ)
द्वितीय पारितोषिक (रूपये वीस हजार एक) : साक्री, जि.धुळे (पेरणी नृत्य).
तृतीय पारितोषिक (रूपये पंधरा हजार एक) : जंगो लिंगो ढेमसा नृत्य (नागपूर)
उत्तेजनार्थ बक्षीस (रूपये पाच हजार एक) : वरसुबाई लेझीम पथक (ता. जुन्नर जि. पुणे)

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News