नाशिक :राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 8 जून 2022 पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, जिल्ह्यातील 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद गटाची व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठीची अधिसूचना आज 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील, असेही उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी कळविले आहे.




