” आयकॉन्सफ ऑफ भारत ” वास्त्विक भारतीय यशस्वीझ गाथांना प्रशंसित करणारी एनडीटीव्ही्वरील नवीन सिरीज

Jun 4, 2022

भारतभरातील लघु-उद्योजकांच्‍या यशस्‍वी गाथांना प्रशंसित करणारा शो लॉन्च करण्‍यासाठी IndianMoney.com चा भाग असलेल्‍या फ्रीडम अॅपचा एनडीटीव्‍ही सोबत सहयोग

५ जूनपासून एनडीटीव्‍ही इंडियावर आजच फ्रीडम अॅपवर नोंदणी करा

Nashik : फ्रीडम अॅपने (IndianMoney.com चा भाग) भारतीय शेतकरी, लघु-उद्योजक आणि गृहिणींच्‍या न ऐकण्‍यात आलेल्‍या यशस्‍वी गाथांना प्रशंसित करण्‍यासाठी एनडीटीव्‍ही नेटवर्कसोबत सहयोगाने अद्वितीय शो आयकॉन्‍स ऑफ भारतलॉन्च केला आहे. या व्‍यक्‍तींनी कदाचित सामान्‍य जीवन जगले असेल, पण त्‍यांच्‍या कौशल्‍यांना लाभदायी कृषी व व्‍यवसाय उद्यमांमध्‍ये बदलत असामान्‍य जीवन देखील जगले आहे.

आयकॉन्‍स ऑफ भारत (Icons of Bharat) ही टेलिव्हिजन सिरीज आहे, जी सर्वोत्तम भारत निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या वास्‍तविक कथांना प्रशंसित करेल. आम्‍ही उद्योजक व शेतकऱ्यांना सन्‍मानित करतो, ज्‍यांनी सर्व विषमतांवर मात करत आणि लघु व्‍यवसाय, त्‍यांच्‍या शेतीच्‍या माध्‍यमातून किंवा त्‍यांच्‍या घरांमधून स्‍वत:चा उदरनिर्वाह विकसित करत आर्थिक यश संपादित केले आहे.

१४ एपिसोड्सची ही सिरीज ५ जून २०२२ पासून दर रविववारी रात्री ९.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत एनडीटीव्‍ही इंडियावर प्रसारित होईल आणि एपिसोडचे पुनर्प्रसारण त्‍यानंतर येणाऱ्या शनिवारी रात्री ९.३० वाजता पाहता येईल.

आपण भारताच्‍या स्‍वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना एनडीटीव्‍ही इंडियाचा आयकॉन्‍स ऑफ भारतला स्‍वप्‍न पाहण्‍याचे धाडस केलेल्‍या व्‍यक्‍तींचे असाधारण धैर्य व प्रेरणेला प्रशंसित करणारा व्‍यासपीठ बनवण्‍याचा मनसुबा आहे.

ज्यालोकांनीत्यांच्याक्षेत्रातयशसंपादनकेलेआहेअशानिवडकविख्यातलोकांच्यायशोगाथादाखवूनलाखोभारतीयांनाआयकॉन्सऑफभारतप्रेरणादेऊइच्छिते. आमचे आयकॉन्‍स कृषी, होम बेकिंग, कँडल-मेंकिंग, चॉकलेट-मेकिंग, रिअल इस्‍टेट एजंट्स अशा विभिन्‍न क्षेत्रांमधील आहेत. या शोचा भारतीयांना माहिती देण्‍याचा मनसुबा आहे की कौशल्‍य संपादित करण्‍यासाठी पात्रता किंवा मोठ्या पदवीची गरज नाही, तर शिकण्‍याचे व कोणत्‍याही पूर्वग्रही विचारांना झुगारण्‍याचे मोठे स्‍वप्‍न महत्त्वाचे आहे.  श्री. सीएस सुधीर यांनी सुरू केलेल्‍या फ्रीडम अॅप सारख्‍या व्‍यासपीठांच्‍या माध्‍यमातून पसंतीचे कौशल्‍य आत्‍मसात करण्‍याची प्रक्रिया सुलभ करण्‍यात आली आहे आणि त्‍यासाठी आता फक्‍त व्‍यवसाय निर्माण करत जीवनामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याची जिद्द पाहिजे.

अद्वितीय कथा-आधारित स्‍वरूपाच्‍या माध्‍यमातून हा कार्यक्रम विभिन्‍न पद्धतींनी स्‍वत:चा उदरनिर्वाह निर्माण केलेल्‍या, तसेच आर्थिक स्‍वावलंबीपणा संपादित करून रोजगार-निर्माते बनलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रशंसित करेल. हे आयकॉन्‍स ऑफ भारत‍ स्‍थानिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी व्‍यवसाय स्‍थापित करणारे उद्योजक किंवा कृषी प्रक्रिया सुधारण्‍यासाठी नवीन पद्धतींचा शोध घेतलेले शेतकरी आहेत. या शोचा देशभरातील प्रेक्षकांना त्‍यांची कौशल्‍ये निपुण करण्‍यास आणि देशाच्‍या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या कर्मचारीवर्गाचा भाग बनण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याचा देखील मनसुबा आहे. आयकॉन्‍स ऑफ भारतच्‍या यशस्‍वी गाथा फ्रीडम अॅपवर उपलब्‍ध आहेत, तसेच त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍याप्रमाणेच लघु-उद्योजक बनण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांना प्रेरित करण्‍यासाठी त्‍यामधून कसे जावे याबाबत स्‍टेप-बाय-स्‍टेप मार्गदर्शन देखील आहे.

या कार्यक्रमाचा भाग म्‍हणून ६० आयकॉन्‍स ऑफ भारत त्‍यांच्‍या कथा प्रदर्शित करतील. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये ५ आयकॉन्‍स व त्‍यांच्‍या कथेला प्रशंसित करण्‍यात येईल, ज्‍यांच्‍यापैकी एकाला ‘श्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत’ म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात येईल. आणि ‘श्रेष्‍ठ आयकॉन्‍स’पैकी एकाला आमच्‍या शोच्‍या फिनालेमध्‍ये ‘सर्वश्रेष्‍ठ आयकॉन ऑफ भारत’ म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात येईल;

या प्रक्रियेमध्‍ये आम्‍हाला प्रख्‍यात ज्‍युरी मदत करत आहे. शोच्‍या ज्‍युरीमध्‍ये सुपर ३० उपक्रमासाठी लोकप्रिय भारतीय गणित शिक्षक आनंद कुमार,लेखिका, उद्योजक व प्रेरक वक्‍ता रश्‍मी बंसल,एमबीए चायवाला म्‍हणून लोकप्रिय प्रफुल बिल्‍लोरे आणि आयआयएम कलकत्ता इनोव्‍हेशन पार्कचे अध्‍यक्ष व टीआयई दिल्‍ली-एनसीआरचे अध्‍यक्ष श्रीकांत शास्‍त्री यांचा समावेश आहे.

आयकॉन्स ऑफ भारत आता अर्ज मागवत आहेत. लोक त्यांची नावे या लिंकद्वारे नोंदवू शकतात– iconsofbharat.comकिंवा ffreedomअॅपद्वारे नोंदवू शकतात.

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News