आर्या मिश्राने निर्माण केले बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर

Jun 7, 2022

नाशिक– विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती,पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीने नवनवीन कल्पना जन्म घेतात.या कल्पनांना मूर्त स्वरूप मिळाल्यास देश आत्मनिर्भरतेकडे निश्चितच वेगाने वाटचाल करेल.असेच काहीसे चित्र दिसत आहे ते नाशिकमधील के.के.वाघ इंजिनिअरिंग मध्ये अभियांत्रिकी वर्षाच्या अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आर्या मिश्रा हिने निर्माण केलेल्या एका उत्पादनामुळे.

आर्या मिश्राने तयार केला आहे तो बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर.शेतीमध्ये अनेक कामांसाठी ट्रॅक्टर चे खूप महत्व आहे. सामान्यतः ट्रॅक्टर हे डिझेलवर चालतात.पण डिझेलच्या किमती तसेच त्यातून होणारे प्रदूषण यावर पर्याय म्हणजे बॅटरीवर चालणारा हा ट्रॅक्टर आर्या ने तयार केला आहे हा ट्रॅक्टर 7.5 H.P चा असून त्यामध्ये 48 V ची बॅटरी लावली आहे. हा ट्रॅक्टर ए.सी.मोटारवर चालत असून शेतीमध्ये अनेक कामासाठी जसे पिकांवर औषध फवारणी,पेरणी,नांगरणी यासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतो. नुकतीच या ट्रॅक्टर ची यशस्वी चाचणी घेण्यात आली

आर्या मिश्रा या इंजी. स्व. चंद्रभान मिश्रा यांची सुपुत्री आहे. स्व. चंद्रभान मिश्रा यांनी १९८४ मध्ये बॉटलपेकं हे तंत्रज्ञान जर्मनी तून भारतात आणून नाशिक च्या सातपूर मध्ये कारखाना सुरु केला होता .

या प्रकल्पासाठी के.के. वाघ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.समिर वाघ, प्राचार्य डॉ .केशव नांदुरकर, उपप्राचार्य डॉ शिरीष साने , डॉ.रविंद्र मुंजे, शंतनू शुक्ला, डॉ.शरद धमाळ, इंजि.मनीष मिश्रा व इंजि .प्रेमलता मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनिष रच्चा आणि कांचन शिंदे यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News